डीजिटल चावडीचे उपक्रम कौतुकास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:34 AM2020-12-14T04:34:16+5:302020-12-14T04:34:16+5:30

निघोज : डीजिटल चावडी या समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून निघोज व परिसरातील सर्वसामान्य जनतेसाठी चांगले काम होत आहे, असे प्रतिपादन ...

Digital Chawdi's activities are commendable | डीजिटल चावडीचे उपक्रम कौतुकास्पद

डीजिटल चावडीचे उपक्रम कौतुकास्पद

निघोज : डीजिटल चावडी या समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून निघोज व परिसरातील सर्वसामान्य जनतेसाठी चांगले काम होत आहे, असे प्रतिपादन आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केले आहे.

डीजिटल चावडी या समाजसेवी संस्थेचे संस्थापक मंगेश कुंडलिक वराळ यांनी मोबाईल ॲपच्या माध्यमातून उत्पन्न दाखला, नॉन क्रिमिलेअर, जातीचा दाखला, डोमासाईल, नॅशनॅलिटी, भारतीय दाखला, जातीचा दाखला, जन्म नोंद आदेश, बँक बचत खाते अशा शेकडो शासकीय योजनांना लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती ॲपद्वारे उपलब्ध करून दिली आहे. या उपक्रमाचा प्रारंभ लंके यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सोमनाथ वरखडे, संदीप पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन वराळ, बाजार समितीचे उपसभापती विलास झावरे, संचालक अण्णासाहेब बढे, दादा शिंदे, मारूती रेपाळे, विजय पवार, निलेश घोडे, रामदास वराळ, भीमा लामखडे, कारभारी पोटघन आदी उपस्थित होते.

फोटोओळ १२ निघोज

निघोज येथे डीजिटल चावडी समाजसेवी संस्थेच्या उपक्रमाचा प्रारंभ करताना आमदार निलेश लंके, सभापती प्रशांत गायकवाड व इतर.

Web Title: Digital Chawdi's activities are commendable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.