डिजिटल टॅब शैक्षणिक क्षेत्रासाठी दिशादर्शक ठरतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:15 AM2021-01-10T04:15:25+5:302021-01-10T04:15:25+5:30
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज ओळखून संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १७ प्राथमिक शाळांमधील ९०० मुलांना रोटरी इंडिया लिटरसी मिशन ...
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज ओळखून संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १७ प्राथमिक शाळांमधील ९०० मुलांना रोटरी इंडिया लिटरसी मिशन अंतर्गत रोटरी ई- लर्निंग डिजिटल शैक्षणिक ३०० टॅब वितरणाचा कार्यक्रम गुरूवारी (दि. ७) मालपाणी लॉन्स येथे पार पडला, त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष, उद्योजक डॉ. संजय मालपाणी, रोटरी क्लब पुणे नॉर्थचे कुमारजी शिनगारे, मनीषा कोणकर, रोटरीचे अध्यक्ष पवनकुमार वर्मा, सचिव योगेशजी गाडे, प्रकल्प प्रमुख सुनील कडलग, ओंकार सोमाणी, डॉ. प्रमोद राजुस्कर, नरेंद्र चांडक उपस्थित होते. यावेळी सर्व १७ शाळांमधील शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रातिनिधिक शिक्षिका वृषाली कडलग, वैशाली हासे, श्रीकांत बिडवे यांनी टॅबचा स्वीकार केला. सूत्रसंचालन भुषणकुमार नावंदर व संजय कर्पे यांनी केले. योगेश गाडे यांनी आभार मानले.
चौकट
५० लाख रुपये रूपयांचे योगदान
आमदार डॉ. तांबे यांनी त्यांच्या आमदार निधीतून पाच लाख तर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या आमदार निधीतून पाच लाख असे एकून दहा लाख निधी रोटरी ई - लर्निंग डिजिटल स्कूल टॅबसाठी जाहीर केला आहे. संगमनेर रोटरीचे अध्यक्ष पवनकुमार वर्मा यांनीही या प्रकल्पासाठी ५० हजार रूपयांची देणगी जाहीर केली. या निधीमध्ये रोटरी इंटरनॅशनल ५० लाख रुपये रूपयांचे योगदान देणार असून हा निधी एकूण ६० लाखांचा होणार आहे.
---
फोटो : सुधीर तांबे
ओळ : संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १७ प्राथमिक शाळांमधील ९०० मुलांना रोटरी इंडिया लिटरसी मिशन अंतर्गत रोटरी ई- लर्निंग डिजिटल शैक्षणिक ३०० टॅब वितरण करण्यात आले.