जीर्ण पाण्याची टाकी जेसीबीवर कोसळली; दोघे गंभीर जखमी

By सचिन धर्मापुरीकर | Published: September 1, 2023 06:41 PM2023-09-01T18:41:55+5:302023-09-01T18:42:12+5:30

कोपरगाव तालुक्यातील चांदगव्हाण येथील घटना

Dilapidated water tank collapses on JCB; Both are seriously injured at ahmadnagar | जीर्ण पाण्याची टाकी जेसीबीवर कोसळली; दोघे गंभीर जखमी

जीर्ण पाण्याची टाकी जेसीबीवर कोसळली; दोघे गंभीर जखमी

कोपरगाव (जि. अहमदनगर) : तालुक्यातील चांदगव्हाण येथे ग्रामपंचायतीची जीर्ण झालेली पाण्याची टाकी पाडण्याचे काम सुरू होते. त्याचवेळी ही टाकी जेसीबी मशीनवर कोसळली. या घटनेत जेसीबीचालकासह अनेक एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली.

कोपरगाव तालुक्यातील चांदगव्हाण येथे ग्रामपंचायतची पाण्याची टाकी आहे. ती जुनी झाल्याने पाडून त्या ठिकाणी नवीन जलकुंभ उभारण्यात येणार आहे. जीर्ण झालेली पाण्याची टाकी पाडण्याचे काम शुक्रवारी सकाळी सुरू झाले. दुपारी बाराच्या सुमारास जेसीबी मशीन पाडकाम करीत असताना संपूर्ण टाकी अचानक जेसीबीवर कोसळली. त्यामुळे जेसीबीचालक सचिन मधुकर गीते (रा. जेऊर पाटोदा, ता. कोपरगाव) हा जेसीबीच्या केबिनमध्ये दबला गेला. तसेच अनेक मजूर ढिगार्‍याखाली दबला गेला.

स्थानिक नागरिक, पोलीस प्रशासन व अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तासभराच्या प्रयत्नानंतर कटरच्या साह्याने जेसीबीचे काम केबिन कापून काढले, त्यानंतर जेसीबी चालक सचिन गीते यास बाहेर काढण्यात आले व जखमी मजुरासही बाहेर घेण्यात आले. दोघांनाही रुग्णवाहिकेतून उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे घडल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

Web Title: Dilapidated water tank collapses on JCB; Both are seriously injured at ahmadnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.