दिलीप गांधी खासदार नव्हे ‘खावदार’ : अनिल राठोड यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 11:08 AM2018-04-29T11:08:56+5:302018-04-29T11:10:08+5:30

उंदीर असलेल्यांनी वाघावर बोलू नये. तेवढी त्यांची बोलण्याची उंची नाही. विविध माध्यमांतून केवळ खाऊगिरी करणारे दिलीप गांधी हे खासदार नव्हे, तर खावदार आहेत. केडगाव हत्याकांडानंतर लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी शिवसैनिकांच्या कुटुंबीयांचे साधे सांत्वनही केले नाही, की हत्याकांडाच्या घटनेचा निषेधही केला नाही. यासाठी त्यांना नेमकी कोणाची भीती आहे? असा सवाल शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी पत्रकार परिषदेत केला.

 Dilip Gandhi is not MP, 'Khavdar': Anil Rath | दिलीप गांधी खासदार नव्हे ‘खावदार’ : अनिल राठोड यांची टीका

दिलीप गांधी खासदार नव्हे ‘खावदार’ : अनिल राठोड यांची टीका

अहमदनगर : उंदीर असलेल्यांनी वाघावर बोलू नये. तेवढी त्यांची बोलण्याची उंची नाही. विविध माध्यमांतून केवळ खाऊगिरी करणारे दिलीप गांधी हे खासदार नव्हे, तर खावदार आहेत. केडगाव हत्याकांडानंतर लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी शिवसैनिकांच्या कुटुंबीयांचे साधे सांत्वनही केले नाही, की हत्याकांडाच्या घटनेचा निषेधही केला नाही. यासाठी त्यांना नेमकी कोणाची भीती आहे? असा सवाल शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी पत्रकार परिषदेत केला.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नगर येथील पत्रकार परिषदेत भाजप सरकार निकम्मे असून हत्याकांडांच्या घटनेमुळे नगरचा बिहार झाल्याची टीका केली होती. त्यावर खासदार गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे हे नगरची बदनामी करीत असून, शिवसेनेकडे विकासाचा अजेंडा नसल्याने शिवसेनाच निकम्मी असल्याचा टोला लगावला होता. त्याचा राठोड यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन समाचार घेतला. राठोड म्हणाले, गांधी यांच्यावरही खंडणी, अपहरणाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांनाही लवकरच पिंजºयात जावे लागेल.
केडगाव हत्याकांडाबाबत बोलायला त्यांना २० दिवसांनंतर जाग कशी आली? खासदारांच्या पुत्राची एलईडीची कंपनी आहे. हेच बोगस दिवे शहरात बसविले जात आहेत. एका दिवसात ते बंद पडत असून, केवळ त्यांची खाऊगिरी सुरू आहे. त्यांना शिवसेनेसोबत युती नको आहे, मात्र आम्हालाच गांधी यांच्यासोबत युती नको आहे. खºया भाजपसोबत आम्ही आहोत. युतीबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होतो. गांधी हे भाजपचे नव्हे, तर केवळ छिंदम गटाचे आहेत. काँग्रेसचा उमेदवार विशाल कोतकर निवडून यावा, यासाठीच त्यांनी निवडणुकीतून पळ काढला. कोतकर हे
कदाचित गांधी यांचे सावत्र सोयरे असावेत. भैरवनाथ पतसंस्थेचे त्यांनी कर्ज घेतले, यावरून ते सिद्ध होते. खासदारांनी गांधी या आडनावालाच कलंक लावला. महापालिकेच्या फेज टू बाबत त्यांनी टीका केली. मात्र यापूर्वीच्या सत्ताधा-यांनी या योजनेत घोटाळे केले, त्यावेळी त्यांची बोलायची हिंमत का झाली नाही? असा सवालही राठोड यांनी केला.

दिलीप गांधी यांचे डिपॉझिट जप्त होईल
केडगावच्या निवडणुकीत भाजप उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले. आता लोकसभा निवडणुकीला उभे राहिले तर दिलीप गांधी यांचे डिपॉझिट जप्त होईल. आतापर्यंत शिवसेना सोबत होती म्हणूनच ते तीनवेळा खासदार झाले. शिवाजी कर्डिले विरुद्ध दिलीप गांधी अशी निवडणूक झाली, त्यावेळी आपले नाते भगव्याशी असल्याचे सांगत गांधी यांनाच मतदान करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे माझे सोयरे कोण आहेत, हे गांधी यांनी सांगू नये, अशा शब्दांत शिवसेनेचे दक्षिण जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी गांधी यांचा समाचार घेतला. त्यामुळे लोकसभेचे तिकीट मिळाले तर गांधी हे चौथ्या क्रमांकांवर राहतील. शीला शिंदे महापौर असताना महापालिकेच्या पाणीयोजनांसाठी शिर्डीचे तत्कालीन खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी पाठपुरावा केल्यामुळे महापालिकेला निधी मिळाला. त्यामुळे गांधी यांनी निधी आणल्याची टिमकी वाजवू नये, असे प्रा. गाडे म्हणाले.

गांधींनी कर्ज थकवून ठेवीदारांची वाट लावली
भाई रायसोयी पतसंस्था, रावसाहेब पटवर्धन पतसंस्थेचे कोट्यवधी रुपयांचे खासदार गांधी यांनी कर्ज घेतले. हे कर्ज त्यांनी परत केले नाही. त्यामुळे या पतसंस्थांची वाट लागली. याला खासदार गांधी हेच जबाबदार आहेत. याचे पुरावेही आमच्याकडे आहेत. केडगावची भैरवनाथ पतसंस्था खासदारांना नेहमीच कर्ज देते. त्यामुळे त्यांचे कोतकरांशी लागेबांधे आहेत, हेच स्पष्ट होते, असा आरोप राठोड यांनी केला.

Web Title:  Dilip Gandhi is not MP, 'Khavdar': Anil Rath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.