विकासकामांतून दिलीप गांधी श्रीगोंदेकरांच्या अंतर्मनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:19 AM2021-03-19T04:19:49+5:302021-03-19T04:19:49+5:30
श्रीगोंदा : माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांचे कोरोनाने निधन झाले. त्यामुळे येथील नागरिकांच्या मनाला चटका लागला आहे. दिलीप ...
श्रीगोंदा : माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांचे कोरोनाने निधन झाले. त्यामुळे येथील नागरिकांच्या मनाला चटका लागला आहे. दिलीप गांधी हे त्यांनी केलेल्या विकासकामांच्या माध्यमातून श्रीगोंदेकरांच्या अंतर्मनी राहणार आहेत.
गांधी हे तीन वेळा नगर लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले. तालुक्यात दोन्ही काँग्रेसचे वर्चस्व असताना श्रीगोंदेकरांनी दिलीप गांधी यांना मताधिक्य दिले होते. त्यावर गांधी यांनी स्थानिक राजकारणात कधीच हस्तक्षेप केला नाही. रस्ते, मंदिराचे सभामंडप, अनेक गावांत बसस्टॉपची कामे केली. एखाद्या सामान्य शेतकऱ्याने फोन केला, तरी त्याचे काम ते मार्गी लावत होते. त्यामुळे त्यांनी सामान्य जनतेच्या हृदयात स्थान मिळविले होते. गांधी यांच्या निधनाने आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार राहुल जगताप, नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, राष्ट्रवादीचे नेते घनश्याम शेलार, बाळासाहेब नाहाटा, शुभांगी पोटे, सुवर्णा पाचपुते, राजेंद्र म्हस्के, भगवानराव पाचपुते, सतीश बोरा, मुनीर शेख यांनी आदरांजली वाहिली.