Dilip Walase Patil: आता पोलीस शिपाई होणार PSI, गृह खात्याने घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 01:32 PM2022-04-06T13:32:01+5:302022-04-06T13:33:09+5:30

अजित पवार यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात २ महिला पोलिस व १ पुरूष पोलीस अंमलदारास फ्लॅटच्या चाव्या हस्तांतरित करण्यात आल्या.

Dilip Walase Patil: Now the police constable will be PSI, a big decision taken by the state government | Dilip Walase Patil: आता पोलीस शिपाई होणार PSI, गृह खात्याने घेतला मोठा निर्णय

Dilip Walase Patil: आता पोलीस शिपाई होणार PSI, गृह खात्याने घेतला मोठा निर्णय

अहमदनगर - राज्यातील पोलीसांना सुसज्ज घरे मिळाल्यास त्यांच्या कार्यक्षमतेत निश्चित वाढ होणार आहे. राज्यातील पोलिसांना पुढील दोन महिन्यांत ६,८५३ घरे उपलब्ध करून देण्यात येतील. शासनाने एसआरपीएफ मधील पोलिसांना राज्य पोलिसात घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, पोलीस शिपायास निवृत्तीपर्यंत पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पदोन्नती देण्याचाही निर्णय घेतल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.  

शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, शिर्डी पोलीस ठाणे व शिर्डी येथील पोलीस अमंलदारांच्या ११२ निवासस्थानांचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते झाले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील बोलत होते. पुढे बोलताना पाटील म्हणाले की, कोरोना काळात पोलिसांनी रस्त्यावर येऊन चोवीस तास काम केले. गृह विभाग पोलीसांना घरे व विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पोलीस दलाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे‌. राज्यात धार्मिक तेढ व अशांतता निर्माण होणार नाही, यासाठी काम करावे, अशा सूचनाही गृहमंत्री पाटील यांनी दिल्या आहेत. या इमारतीचे बांधकाम महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित, मुंबई यांनी केले आहे. 

दरम्यान, यावेळी अजित पवार यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात २ महिला पोलिस व १ पुरूष पोलीस अंमलदारास फ्लॅटच्या चाव्या हस्तांतरित करण्यात आल्या. कार्यक्रमाचे संयोजन अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, कार्यकारी अभियंता सुनिल‌ सांबे, उप विभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, हिरालाल पाटील यांनी केले.
 

Web Title: Dilip Walase Patil: Now the police constable will be PSI, a big decision taken by the state government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.