दिव्यांगांचे प्राधान्याने लसीकरण करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:34 AM2021-05-05T04:34:50+5:302021-05-05T04:34:50+5:30
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिव्यांग व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती सामान्य व्यक्तीच्या तुलनेत कमी असल्याने त्यांना कोरोनाचा अधिक धोका ...
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिव्यांग व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती सामान्य व्यक्तीच्या तुलनेत कमी असल्याने त्यांना कोरोनाचा अधिक धोका असतो. ही बाब लक्षात घेत राज्याचे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यातील दिव्यांग व्यक्तींना दिलासा देणारे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्याची अंमलबजावणी आपल्या जिल्ह्यात करावी.
सध्या कडक लॉकडाऊन असल्यामुळे कोणतीही प्रवासाची साधने उपलब्ध होत नाहीत. रांगेत तिष्ठत उभे राहण्याची अडचण लक्षात घेत जिल्ह्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींना कोरोना लसीकरणासाठी आठवड्यातील एक वार राखीव ठेवावा किंवा दिव्यांगांना घरी जाऊन लसीकरण करावे, अशी विनंती पोकळे यांनी केली आहे. या पत्रकावर प्रहार संघटनेचे मधुकर घाडगे, संजय पुंड, हमीद शेख यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.