शिस्त हीच खरी जीवननिष्ठा-विष्णू महाराज पारनेरकर,घराघरात साजरा झाला पूर्णवाद ई-महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 09:06 PM2020-05-20T21:06:36+5:302020-05-20T21:06:46+5:30
अहमदनगर : देवाला व्यवस्था आवडते. व्यवस्थेसाठी शिस्त असणे महत्त्वाचे असते. शिस्त ही आनंदाने पाळली गेली पाहिजे. आनंदाने शिस्त पाळली तरच ती खरी जीवननिष्ठा म्हणता येईल, असे प्रतिपादन पूर्णवाद परिवाराचे प्रमुख अॅड. विष्णू महाराज पारनेरकर यांनी केले.
अहमदनगर : देवाला व्यवस्था आवडते. व्यवस्थेसाठी शिस्त असणे महत्त्वाचे असते. शिस्त ही आनंदाने पाळली गेली पाहिजे. आनंदाने शिस्त पाळली तरच ती खरी जीवननिष्ठा म्हणता येईल, असे प्रतिपादन पूर्णवाद परिवाराचे प्रमुख अॅड. विष्णू महाराज पारनेरकर यांनी केले.
पूर्णवाद परिवाराच्या दत्त प्रतिष्ठापना महोत्सव आणि गुरु-शिष्य मेळाव्याला दरवर्षी हजारो शिष्यगण पारनेरमध्ये येतात. कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर यंदा पूर्णवाद परिवाराचा महोत्सव घराघरातून साजरा करण्यात आला. ‘उत्सव तुमच्या घरी, पूर्णवाद राहो अंतरी’ या घोषवाक्यासह साजरा झालेल्या या ई-महोत्सवात आपल्या घरातूनच हजारो शिष्यांनी सहभाग घेतला. राज्याच्या विविध भागातून वेबिनारवर व्याख्याने, संगीत मैफल, भजन, प्रवचन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रथमत झालेल्या या ई-मेळाव्यात विष्णू महाराज यांनी शिष्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, वेद आणि संगीत यांची सेवा जीवनात आनंद प्रदान करते. वेद म्हणजे कृती किंवा संकल्प आहे. संगीत म्हणजे आनंद आहे. संगीतामुळे जीवनात सर्वोच्च आनंद मिळतो. वेदनिष्ठा आणि देवनिष्ठा दोन्हीही आवश्यक आहेत. स्वधर्म समजून निष्ठा अंगी बाळगता आली पाहिजे. व्यक्ती म्हटले की परमार्थ गरजेचा आहे. ज्ञानामुळे अहंकार होतो. त्यामुळे शिष्य आहे, याचे सतत स्मरण व्हावे, यासाठी जीवनात गुरू आवश्यक आहे.
या महोत्सवात अॅड. गुणेश पारनेरकर यांना पूर्णाचार्य, तर लक्ष्मीकांत पारनेरकर यांनी प्रज्ञावंत पुरस्काराने गौरविण्यात आले. अनेक उपासकांचा सत्शिष्य पुरस्काराने गौरव करण्यात आला. राज्यभरातील उपासकांनी आपापल्या घरी यंदा पूर्णवाद महोत्सव उत्साहात साजरा केला. २२ मे रोजी या ई-महोत्सवाचा समारोप होणार आहे. समितीचे अध्यक्ष गुलजारसिंह राजपूत, उपाध्यक्ष गणेशराव जहागीरदार यांच्यासह अनेकांनी या ई-महोत्सवासाठी परिश्रम घेतले.
--