‘आपडो माणस बडाप्रधान बनो गयो’
By Admin | Published: May 21, 2014 11:41 PM2014-05-21T23:41:47+5:302014-05-22T00:00:50+5:30
शिर्डी : कोणता व्यवसाय करता, व्यवसाय कसा चालतो, तुमची उपजीविका व्यवस्थित चालते का, नाहीतर गुजरातला चला, तिकडे काहीतरी व्यवस्था करतो हे आपुलकीचे व आश्वासक वाक्य आहेत
शिर्डी : कोणता व्यवसाय करता, व्यवसाय कसा चालतो, तुमची उपजीविका व्यवस्थित चालते का, नाहीतर गुजरातला चला, तिकडे काहीतरी व्यवस्था करतो हे आपुलकीचे व आश्वासक वाक्य आहेत गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री व देशाचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे़ गुजराती माणूस मोदींच्या मागे का एकवटला याचा हा बोलता पुरावा आहे़ गेल्या चार वर्षांपूर्वी साईदर्शनालाआलेल्या मोदींची येथील गुजराती समाजाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली होती़ त्यावेळी त्यांनी प्रत्येकाची आस्थेने चौकशी केली़ गुजरात का सोडला याची कारणंही मोदींनी जाणून घेतली़ आता रोजगारासाठी गुजराती माणसाला भटकावे लागणार नाही, असा आत्मविश्वासही मोदींनी त्यावेळी व्यक्त केल्याची आठवण येथील घनश्याम दोडिया, प्रवीणभाई पटेल यांनी ‘लोकमत’ला सांगितली़ या शिष्टमंडळात गोविंदभाई पटेल, गोपाळभाई पटेल आदींचा समावेश होता़ ‘आपडो गुजरातनो माणस आजे समग्र भारतनो बडाप्रधान (पंतप्रधान) बनो गयो’ ही भावना व्यवसायाच्या निमित्ताने देशभर विखुरलेल्या गुजराती कुटुंबांचा आनंद द्विगुणित करणारी आहे़यामुळे अनेक कुटुंबात दिवाळी साजरी झाली़ पक्षीय राजकारण काहीही असो मात्र आपला माणूस पंतप्रधान होत आहे़ राज्याने महात्मा गांधींनंतर देशाला सर्वात प्रभावी व्यक्ती दिली आहे, या भावनेतून गुजरातमधीलच नव्हे तर देशभर विखुरलेल्या गुजराती माणसाने मोदींचा विजयोत्सव साजरा केला़ (वार्ताहर)