कुकडीच्या पाण्याचे नियोजन विस्कळीत,चाºया रिकाम्याच : कमी दाबाने पाणी सोडल्याने नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 12:44 PM2020-04-19T12:44:55+5:302020-04-19T12:47:20+5:30

आढळगाव : श्रीगोंदा तालुक्यात कुकडी कालव्याचे आवर्तन सुरु झाल्यानंतर पहिल्याच दिवशी नियोजन कोलमडल्यामुळे शेतकºयांची चिंता वाढली आहे. पहिल्या दिवशी आढळगाव परिसरातील गावांना पाणी सोडल्यानंतर पाण्याचा दाब कमी झाल्यामुळे कोणत्याही चारीला शेवटपर्यंत पाणी पोहोचले नाही. 

Dispersal of Cucumber Water Planning, empty of 6: Annoyed by releasing water at low pressure | कुकडीच्या पाण्याचे नियोजन विस्कळीत,चाºया रिकाम्याच : कमी दाबाने पाणी सोडल्याने नाराजी

कुकडीच्या पाण्याचे नियोजन विस्कळीत,चाºया रिकाम्याच : कमी दाबाने पाणी सोडल्याने नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्क
आढळगाव : श्रीगोंदा तालुक्यात कुकडी कालव्याचे आवर्तन सुरु झाल्यानंतर पहिल्याच दिवशी नियोजन कोलमडल्यामुळे शेतकºयांची चिंता वाढली आहे. पहिल्या दिवशी आढळगाव परिसरातील गावांना पाणी सोडल्यानंतर पाण्याचा दाब कमी झाल्यामुळे कोणत्याही चारीला शेवटपर्यंत पाणी पोहोचले नाही. 
गेल्या महिनाभरापासून कर्जत आणि करमाळा तालुक्यात कुकडीचे आवर्तन पूर्ण दाबाने सुरु असताना श्रीगोंदा तालुक्यात आवर्तन सुरु झाले की पाण्याचा दाब कमी का होतो ? हा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. शुक्रवार ( दि. १७ ) पासून श्रीगोंदा तालुक्यातील शेतीला कुकडीचे आवर्तन सुरु होणार असल्याचे आमदार बबनराव पाचपुते यांनी जाहीर केले. पहिल्या दिवशी चारी क्र. १४, १३ आणि १२ ला  टेल टू हेड पध्दतीने पाणी सुरु झाले. परंतु दुपारनंतर कुकडीच्या मुख्य कालव्यातील पाण्याचा दाब कमी होऊन सोडलेल्या चाºया बंद झाल्या. तिन्ही चाºयांपैकी एकाही चारीचे पाणी टेल पर्यंत पोहोचले नाही. शनिवारी फक्त चारी क्र. १३ आणि १४ ला कमी दाबाने पाणी सोडले, मग नियोजनाचे काय ? असा सवाल शेतकरी करीत आहेत.
कोरोनाच्या संकटामुळे सुरु झालेल्या लॉकडाऊनमध्ये शेतकºयांचे कंबरडे मोडले असताना कुकडीच्या पाण्याचे नियोजन कोलमडल्यामुळे उभी पिके आणि फळबागा धोक्यात आल्या आहेत. उन्हाळा वाढल्यामुळे सर्वांना पाण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यातच पूर्ण दाबाने पाणी मिळत नसल्यामुळे शेतकºयांची चिंता वाढली आहे. उन्हाळी पिकांसह फळबागांना पाणी आवश्यक असल्यामुळे आवर्तन सुरळीतपणे पार पडण्याची अपेक्षा  शेतकºयांमधून व्यक्त होत आहे. 
--कोट
कुकडीचे आवर्तन सुरळीतपणे पार पडणार असून सर्व शेतकºयांना पूर्ण दाबाने पाणी देणार आहे. भरणे झाल्याशिवाय पाणी बंद होणार नाही. 
-स्वप्निल काळे, कार्यकारी अभियंता, सिंचन शाखा,श्रीगोंदा. 
---

फोटो आढळगाव ( ता. श्रीगोंदा )  शिवारात कुकडी चारी क्र. १३ चे टिपलेले छायाचित्र. चारीमध्ये पाण्याची पातळी पाहूनच पाण्याचा दाब लक्षा

Web Title: Dispersal of Cucumber Water Planning, empty of 6: Annoyed by releasing water at low pressure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.