लोकन्यायालयात १६ हजार १०० प्रकरणांचा निपटारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:22 AM2021-09-27T04:22:12+5:302021-09-27T04:22:12+5:30
यामध्ये एकूण ७२ कोटी ६७ लाख ९१ हजार ५९४ रुपयांची वसुली झाली. जिल्हा न्यायालयात लोकअदालत अध्यक्ष सुधाकर यार्लगड्डा, जिल्हा ...
यामध्ये एकूण ७२ कोटी ६७ लाख ९१ हजार ५९४ रुपयांची वसुली झाली. जिल्हा न्यायालयात लोकअदालत अध्यक्ष सुधाकर यार्लगड्डा, जिल्हा न्यायाधीश मिलिंद कुर्तडीकर यांच्या उपस्थित लोकन्यायालयाचे उद्घाटन झाले. यावेळी विधिसेवा प्राधिकरणच्या सचिव रेवती देशपांडे, शहर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. भूषण बऱ्हाटे, सेंट्रल बारचे अध्यक्ष ॲड. सुभाष काकडे, सरकारी वकील ॲड. सतीश पाटील, आदी उपस्थित होते. लोकन्यायालयात समझोत्यासाठी दिवाणी प्रकरणे, फौजदारी एन. आय. ॲक्ट प्रकरणे, बँक कर्ज वसुली प्रकरणे, मोटार वाहन अपघात नुकसानभरपाई, कामगार कायद्यातील प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, वीज महावितरण, आदी प्रकरणे ठेवण्यात आली होती. महानगरपालिकेची करवसुली प्रकरणेही यामध्ये मिटविण्यात आली. यासाठी न्यायालय आवारात स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती.
------------------------
पक्षकारांच वेळ अन् खर्च वाचला
अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली प्रकरणे लोकन्यायालयात समझोत्याने मिटल्याने पक्षकारांनी समाधान व्यक्त केले. एका दिवसांत अनेक प्रकरणे मार्गी लागल्याने अनेक पक्षकारांचा वेळ आणि खर्चही वाचला. लोकन्यायालयात जास्तीतजास्त प्रकरणांचा निपटारा होण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव रेवती देशपांडे यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांना न्यायाधीश सुधाकर यर्लगड्डा व न्या. मिलिंद कुर्तडीकर यांचे मार्गदर्शन लाभले.
---------------
फोटो २६ अदालत