२ लाख ३८ हजार अर्सेनिक अल्बमच्या वाटपाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:15 AM2021-01-10T04:15:07+5:302021-01-10T04:15:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीच्या १४ व्या वित्त आयोगाच्या बँकेतील रकमेवर मिळालेल्या व्याजाच्या रकमेतून जिल्हा परिषदेमार्फत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपरगाव : जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीच्या १४ व्या वित्त आयोगाच्या बँकेतील रकमेवर मिळालेल्या व्याजाच्या रकमेतून जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यात अर्सेनिक अल्बम या प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या गोळ्यांचे वाटप करण्यात येत आहे. त्याच धर्तीवर कोपरगाव तालुक्यातील ७९ गावांत ७५ ग्रामपंचायतींमार्फत सुमारे २ लाख ३८ हजार बॉटलचे ग्रामस्थांना मोफत घरोघरी वाटप करण्यात येत आहे. तशी वाटपाला प्रत्यक्षात सुरुवातदेखील करण्यात आली आहे. या बॉटलमध्ये प्रत्येकी ५० गोळ्या आहेत.
.........
ग्रामपंचायत, आरोग्य विभाग यांच्यामार्फत अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे अद्यापपर्यंत आमच्यापर्यंत वाटप झालेले नाही अथवा तशी माहितीदेखील आमच्यापर्यंत दिली गेलेली नाही. अशी प्रतिक्रिया कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागातील खोपडी येथील ग्रामस्थ संजय त्रिभुवन व पश्चिम भागातील चासनळी येथील कैलास चांदगुडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दिली आहे.
......
कोपरगाव तालुक्यातील ७९ गावांतील ग्रामस्थांसाठी देण्यात येणाऱ्या अर्सेनिक अल्बम या गोळ्या दोन टप्प्यांत पंचायत समितीला प्राप्त झाल्या आहेत. या गोळ्या मुंबई येथे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आल्या होत्या. गोळ्यांचा तपासणी अहवाल हा योग्य आल्यानंतरच तालुक्यात या गोळ्यांची वाटप सुरू केले आहे. अद्यापपर्यंत गोळ्याबाबत कोणतीही तक्रार नाही. तसेच काही छोट्या गावांची वाटप पूर्ण झाली असून येत्या १० तारखेपर्यंत संपूर्ण तालुक्याचे गोळ्यांचे वाटप पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
- सचिन सूर्यवंशी, गटविकास अधिकारी, प. सं., कोपरगाव