शुभयान ऑटोमध्ये सीएनजी बीएस-६ वाहनांचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:36 AM2021-03-04T04:36:50+5:302021-03-04T04:36:50+5:30
येथील शुभयान ऑटो प्रा.लि येथे जिल्ह्यातील पहिल्या पाच टाटा एलपीटी ११०९ सीएनजी वाहनांचा वितरण सोहळा पार पडला. शुभयानकडे टाटा ...
येथील शुभयान ऑटो प्रा.लि येथे जिल्ह्यातील पहिल्या पाच टाटा एलपीटी ११०९ सीएनजी वाहनांचा वितरण सोहळा पार पडला.
शुभयानकडे टाटा मोटर्सच्या मालवाहू वाहनांची अहमदनगर आणि
सातारा जिल्ह्यांची डीलरशिप आहे. १ एप्रिल २०२० पासून देशभरात
बीएस-६ (भारत स्टेज-६) प्रदूषण मानकांची पूर्ती करणारी वाहनेच विक्री
केली जात आहेत. मे. अनमोल ट्रान्सपोर्ट कंपनीने ही वाहने खरेदी केली आहेत. शुभयान ऑटोचे संचालक विकी मुथा यांच्या हस्ते अनमोल ट्रान्सपोर्टचे सरबजित सिंग यांना वाहनांचा ताबा देण्यात आला. याप्रसंगी शुभयान ऑटोचे
संचालक नीलेश चोपडा, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक बोठे,
सुंदरम फायनान्सचे व्यवस्थापक संदीप देशमुख, टाटा मोटर्स फायनान्सचे चेतन
काटे, एचडीएफसी बँकेचे चेतन म्हस्के, एचडीबी फायनान्सचे विकास खाडे,
चोलामंडलम फायनान्सचे गणेश शेलार, एयू बँकेचे शाखाधिकारी अशोक मोरे
उपस्थित होते.
वा.प्र.
फोटो ०२
ओळी - शुभयान ऑटोचे संचालक विकी मुथा यांच्या हस्ते अनमोल ट्रान्सपोर्टचे सरबजित सिंग यांना वाहनांचा ताबा देण्यात आला.