दाणेवाडीत कोरोना संरक्षण साहित्याचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:19 AM2021-05-24T04:19:36+5:302021-05-24T04:19:36+5:30
देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी व परिसरातील १७० कुटुंबीयांना दिलीप थेऊरकर यांच्यावतीने कोरोना सुरक्षा कीटचे वाटप करण्यात आले. ‘माझ ...
देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी व परिसरातील १७० कुटुंबीयांना दिलीप थेऊरकर यांच्यावतीने कोरोना सुरक्षा कीटचे वाटप करण्यात आले.
‘माझ गाव-माझी जबाबदारी’ मोहीम हाती घेत दाणेवाडी राजापूरचे ग्रामपंचायत सदस्य दिलीप कांतीलाल थेऊरकर यांनी स्वखर्चातून गावातील १७० कुटुंबीयांना कोरोना सुरक्षा कीटचे वाटप केले. यात सॅनिटायझर, मास्क व व्हिटॅमिन सी गोळ्यांचे वाटप करण्यात आले. तसेच ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ याविषयी जागृती करताना कोरोना धोक्याची जाणीव ग्रामस्थांना करून दिली.
यासाठी माजी अध्यक्ष युवराज थेऊरकर, सेवा संस्थाचे अध्यक्ष आप्पा रसाळ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अहिलु थेऊरकर, आशासेविका कुसुम मांडगे, भानुदास मांडगे यांनी मोलाचे सहकार्य केले.
सर्व ग्रामस्थांना घरोघरी जाऊन कीट देण्याचे काम प्राथमिक शिक्षक रावसाहेब दरेकर, संतोष बारगळ यांनी करत सामाजिक कार्याला हातभार लावला.
---
२३ दाणेवाडी
दाणेवाडी येथे कोरोना संरक्षण कीटचे वाटप करताना प्राथमिक शिक्षक.