गरजूंना मिष्टान्न भोजनाचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:16 AM2021-05-03T04:16:06+5:302021-05-03T04:16:06+5:30

घर घर लंगर सेवेच्या सेवादारांनी शहरातील हॉटेल नटराज व जैन पितळे वसतिगृह येथील गुरू अर्जुन देव कोविड केअर सेंटर, ...

Distribution of desserts to the needy | गरजूंना मिष्टान्न भोजनाचे वाटप

गरजूंना मिष्टान्न भोजनाचे वाटप

घर घर लंगर सेवेच्या सेवादारांनी शहरातील हॉटेल नटराज व जैन पितळे वसतिगृह येथील गुरू अर्जुन देव कोविड केअर सेंटर, डॉन बॉस्को ग्रामीण विकास केंद्र, विविध हॉस्पिटलचे कोविड सेंटर व अमरधाममधील कर्मचाऱ्यांना प्रसाद रूपात मिष्टान्न भोजन देण्यात आले. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून कोरोना रुग्णांना व गरजूंना मिष्टान्न भोजन देण्यात आल्याचे लंगर सेवेचे हरजितसिंह वधवा यांनी दिली.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रीतपालसिंह धुप्पाड, किशोर मुनोत, राजेंद्र कंत्रोड, सतीश गंभीर, करण धुप्पड, राजा नारंग, गोविंद खुराणा, नारायण अरोरा, राहुल शर्मा, कैलाश नवलानी, प्रमोद पंतम, पुरुषोत्तम बेट्टी, सनी वधवा, राहुल शर्मा, राहुल बजाज, प्रशांत मुनोत, राजबीरसिंग संधू, आदित्य छाजेड, सुनील थोरात, सिमर वधवा, मनोज मदान, गोविंद खुराणा, कैलाश ललवानी, टोनी कुकरेजा, मन्नू कुकरेजा आदीनी परिश्रम घेतले.

----------

फोटो- ०२ घर घर लंगर सेवा

घर घर लंगर सेवेच्या वतीने शहरातील कोविड सेंटरमधील रुग्ण, त्यांचे नातेवाईक व गरजूंना मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले. समवेत हरजितसिंग वधवा व सहकारी.

Web Title: Distribution of desserts to the needy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.