अनाथआश्रमातील मुलांना फळांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:21 AM2021-05-26T04:21:05+5:302021-05-26T04:21:05+5:30
याप्रसंगी सीआयएसएफ शिर्डी संरक्षिका अध्यक्षा वैशाली दहिवदकर यांनी मुलांशी संवाद साधला. तुम्ही देवाची अमूल्य भेट आहात, असे सांगत दहिवटकर ...
याप्रसंगी सीआयएसएफ शिर्डी संरक्षिका अध्यक्षा वैशाली दहिवदकर यांनी मुलांशी संवाद साधला. तुम्ही देवाची अमूल्य भेट आहात, असे सांगत दहिवटकर यांनी आम्ही सदैव तुमच्या बरोबर आहोत, अशी ग्वाही अनाथ मुलांना दिली. सामाजिक जबाबदारी म्हणून अनाथालयासाठी संरक्षिकांच्या वतीने मदतीचा हात नेहमी पुढे राहील, असेही त्यांनी सांगितले. या वेळी साई सावली बाल अनाथालयाच्या अध्यक्षा संजया एकनाथ उदमले यांनी आभार मानले. कार्यक्रमास संरक्षिका परिवारच्या सदस्या उपनिरीक्षक सुषमा कुमारी स्वामी, नीता शेळके, कामिनी चौधरी, नीता जाधव, रमा कुमारी, मीना पाल, राधादेवी या उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाशिवाय युनिटच्या सदस्यांनी निमगावच्या काही गरजू लोकांमध्ये खाद्य पदार्थांचे वाटप केले. उपकमाडेंट दिनेश दहीवदकर, निमगावचे सरपंच कैलास कातोरे आणि युनिटचे सदस्य या वेळी उपस्थित होते.