कामठी येथे किराणा साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:16 AM2021-05-28T04:16:56+5:302021-05-28T04:16:56+5:30

मांडवगण : कामठी (ता. श्रगोंदा) येथील सेवा संस्थेचे अध्यक्ष देवीदास चेमटे यांनी स्वखर्चातून आदिवासी, गरजू सत्तर कुटुंबांना किराणा साहित्याचे ...

Distribution of groceries at Kamathi | कामठी येथे किराणा साहित्य वाटप

कामठी येथे किराणा साहित्य वाटप

मांडवगण : कामठी (ता. श्रगोंदा) येथील सेवा संस्थेचे अध्यक्ष देवीदास चेमटे यांनी स्वखर्चातून आदिवासी, गरजू सत्तर कुटुंबांना किराणा साहित्याचे वाटप केले.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रभावी लाॅकडाऊन चालू असताना हातावरचे पोट असणाऱ्या शेतमजुरांच्या हाताला काम नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. गोरगरिबांना राज्य शासनाकडून या महिन्यात मोफत धान्य मिळाले; परंतु हाताला काम नसल्याने त्यांच्या तेला-मिठाचा प्रश्‍न निर्माण झाला होता. अशा अडचणीच्या काळामध्ये कामठी येथील देवीदास चेमटे यांनी तीस हजार किमतीचे किराणा साहित्य येथील ७० कुटुंबांना दिले. शासकीय नियमांचे पालन करून काही कुटुंबांना प्रातिनिधिक स्वरूपात साहित्याचे वाटप करण्यात आले. इतरांना घरोघरी जाऊन देण्यात आले. यावेळी देवीदास आरडे यांच्यासह पोलीस पाटील दादासाहेब आरडे, भाऊसाहेब आरडे, राजू तोरडे, देवीदास तोरडे (कोविड योद्धा), परशू शिंदे, अप्पासाहेब टकले, गोवर्धन कार्ले, राजाराम शिंदे, गोविंद शिंदे, लक्ष्मण वाघमारे आदी उपस्थित होते. यासाठी अक्षय गडकरी, सुनील शिंदे, दत्ताभाऊ कांबळे, सहादू गोलवाड, रवी तोरडे, विकास तोरडे, योगेश तोरडे आदींनी परिश्रम घेतले.

---

२७ कामठी

कामठी येथे देवीदास चेमटे यांच्या वतीने गरजू ७० कुटुंबांना किराणा साहित्य वाटप करण्यात आले.

Web Title: Distribution of groceries at Kamathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.