आव्हाड फाउंडेशनच्या वतीने गरजूंना किराणा वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:24 AM2021-05-25T04:24:30+5:302021-05-25T04:24:30+5:30
पाथर्डी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत हातावर पोट असणाऱ्या अनेकांचा रोजगार बुडाला. जगावे कसे याची चिंता त्यांच्या समोर होती. ...
पाथर्डी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत हातावर पोट असणाऱ्या अनेकांचा रोजगार बुडाला. जगावे कसे याची चिंता त्यांच्या समोर होती. अशा स्थितीत माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांचे अभय आव्हाड प्रतिष्ठान लोकांच्या मदतीसाठी धावून आले. त्यांनी गरजूंना किराणा साहित्य मोफत दिले. मागील वर्षीच्या कोरोना लाटेतही अभय आव्हाड प्रतिष्ठानमार्फत शहरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात मदत करण्यात आली होती. दुसऱ्या लाटेतही आव्हाड प्रतिष्ठानने गरजूंना किराणा साहित्य मोफत दिले. यामध्ये रिक्षा चालविणाऱ्यांचाही समावेश केला. अभय आव्हाड यांच्या पत्नी कविता आव्हाड यांच्या मैत्रीय ग्रुपच्या वतीने मोलमजुरी करणाऱ्या महिलांनाही किराणाचे वाटप करण्यात आले. सफाई कामगारांच्या कार्याला सलाम करून त्यांचा सन्मान करून त्यांना मदत केली. प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी करीत त्यांना अर्सेनिक अल्बम या रोगप्रतिकारक गोळ्यांचे वाटप केले.
पार्थ विद्या प्रसारक मंडळास खासदार सुजय विखे यांच्या खासदार निधीतून मिळालेल्या रुग्णवाहिकेतून ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर कोरोना रुग्णांना नगर येथे व्यवस्था करण्यात आली आहे.
----
२४ आव्हाड
पाथर्डीत आव्हाड फाउंडेशनच्या वतीने हमालांना किराणा वाटप करण्यात आला.