अनामप्रेम संस्थेतील विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:23 AM2021-09-27T04:23:11+5:302021-09-27T04:23:11+5:30
यावेळी महाराष्ट्र राज्य औषधी परिषदेचे संचालक प्रमोद सोळंकी, जिल्हा केमिस्ट संघटनेचे संचालक संजय गुगळे, शहर संघटनेचे माजी अध्यक्ष अनिल ...
यावेळी महाराष्ट्र राज्य औषधी परिषदेचे संचालक प्रमोद सोळंकी, जिल्हा केमिस्ट संघटनेचे संचालक संजय गुगळे, शहर संघटनेचे माजी अध्यक्ष अनिल गांधी, अभय मुथा, जायंटस ग्रुपचे अध्यक्ष दीपक मुथा, अनामप्रेमचे सहसंचालक अजित कुलकर्णी आदी उपस्थित होते.
गुगळे म्हणाले, कोरोनाच्या संकटकाळात जिवाची पर्वा न करता औषधी विक्रेत्यांनी सेवा दिली. संपूर्ण देश टाळेबंदीत घरी असताना औषध विक्रेत्यांनी घराबाहेर पडून रुग्णांना औषध पुरविण्याचे कार्य केले. यावेळी अनामप्रेमचे अनिल सदार, विशाल निंबाळकर, मयूर शेलार, प्रकाश गजे, राहुल खिरोडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन विलास शिंदे यांनी तर आभार आदिनाथ दांडगे यांनी मानले.
.................
फोटो २६ पुरस्कार
ओळी-जायंट्स ग्रुपच्या वतीने जागतिक औषधी विक्रेता दिनानिमित्त अनामप्रेम संस्थेतील विद्यार्थ्यांना किराणा साहित्यासह सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले.