दूध उत्पादकांना मास्क, सॅनिटायझर वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:18 AM2021-04-26T04:18:53+5:302021-04-26T04:18:53+5:30

पागोरी पिंपळगाव : पाथर्डी तालुक्यातील ढवळेवाडी येथे दूध उत्पादक शेतकऱ्यांना स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक कृषिराज टकले यांनी मास्क ...

Distribution of masks, sanitizers to milk producers | दूध उत्पादकांना मास्क, सॅनिटायझर वाटप

दूध उत्पादकांना मास्क, सॅनिटायझर वाटप

पागोरी पिंपळगाव : पाथर्डी तालुक्यातील ढवळेवाडी येथे दूध उत्पादक शेतकऱ्यांना स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक कृषिराज टकले यांनी मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले. तालुक्यात दूध उत्पादक संघांमध्ये स्व. राजीव राजळे दूध संघ संस्थेचे कार्य कौतुकास्पद आहे. तसेच अनेक दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या संस्था समजावून घेते, असे मत टकले यांनी यावेळी व्यक्त केले. कोरोना काळात सर्व दूध उत्पादकांनी दूध संकलन केंद्रावर येताना तोंडावर मास्क लावावे तसेच आजार होऊ नये यासाठी नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले. दूध संकलन केंद्र व संस्थेचे अध्यक्ष संजय कावळे, स्वाभिमानी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अंकुश डांभे, प्रवीण गर्जे, अमोल वाळके, आदिनाथ वाळके, अशोक चितळे, शाहुराव चितळे, चंद्रकांत चितळे, विष्णू चितळे, सुभाष चितळे, देवीदास चितळे, विठ्ठल चितळे उपस्थित होते.

Web Title: Distribution of masks, sanitizers to milk producers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.