महिलांना वाण म्हणून मास्कचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:19 AM2021-01-21T04:19:38+5:302021-01-21T04:19:38+5:30
अहमदनगर : हळदी-कुंकू कार्यक्रमात कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेची जनजागृती करुन, महिलांना वाण म्हणून मास्कचे वाटप करण्यात आले. नुकताच बुरुडगाव रोड ...
अहमदनगर : हळदी-कुंकू कार्यक्रमात कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेची जनजागृती करुन, महिलांना वाण म्हणून मास्कचे वाटप करण्यात आले. नुकताच बुरुडगाव रोड येथील सौरभ कॉलनीत महिलांचा हा पारंपरिक सोहळा एकमेकींच्या आरोग्याची काळजी घेत पार पडला.
यावेळी अॅड. प्रणाली चव्हाण, मनिषा भळगट, स्वीटी लोढा, सुनिता थिटे, दुर्गावती चव्हाण, नीलिमा पाटकर, सौ. आंधळे, मुथा, सोनाली गांधी, जिया सिंग, कदम, सातपुते, अॅड. सामलेटी, संध्या चव्हाण, डॉ. गौरी चव्हाण आदींसह महिला उपस्थित होत्या.
अॅड. प्रणाली चव्हाण म्हणाल्या, प्रत्येक सांस्कृतिक व धार्मिक कार्यास सामाजिक उपक्रमाची जोड आवश्यक आहे. मराठी संस्कृती जपत व इतरांच्या आरोग्याची काळजी घेत हा उपक्रम राबविण्यात आला आहे. यावेळी उपस्थित महिलांना कोरोना संक्रमण रोखण्यासाठी बचावात्मक उपायांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दुर्गावती चव्हाण यांनी केले. डॉ. गौरी चव्हाण यांनी आभार मानले.
-------
फोटो- २० बुरुडगाव
बुरुडगाव रोड येथील सौरभ कॉलनीत हळदी-कुंकू कार्यक्रमात महिलांना मास्क वाटप करून कोरोना प्रतिबंधात्मक उपायांबाबत जागृती करण्यात आली. यावेळी ॲड. प्रणाली चव्हाण, मनिषा भळगट, स्वीटी लोढा, सुनिता थिटे आदी.