पालावरील बालकांना शालेय साहित्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:21 AM2021-09-11T04:21:59+5:302021-09-11T04:21:59+5:30
सामाजिक बांधिलकी जोपासत महिलांनी हा उपक्रम राबविला. केअरिंग फ्रेंड्स संस्थेद्वारे चालविण्यात येणाऱ्या पालावरील शाळांमधील (बालसंस्कार केंद्र) मुलांना शालेय साहित्य ...
सामाजिक बांधिलकी जोपासत महिलांनी हा उपक्रम राबविला. केअरिंग फ्रेंड्स संस्थेद्वारे चालविण्यात येणाऱ्या पालावरील शाळांमधील (बालसंस्कार केंद्र) मुलांना शालेय साहित्य वाटप कार्यक्रमप्रसंगी समानता वस्तीस्तर संघाच्या संस्थापिका आशा पांडुळे, मनीषा घोरपडे, सिमरन बोरा, हेमा कथुरिया, अनिता पवार, आयशा मिर्झा, पूनम झेंडे व केअरिंग फ्रेंड्सचे संस्थापक युवराज गुंड, सुरेश शेगर उपस्थित होते.
बहुरूपी वस्ती येथे मोठ्या प्रमाणात उपेक्षित वंचित समाजातील डवरी गोसावी कुटुंब वास्तव्यास आहे. या मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केअरिंग फ्रेंड्स संस्थेद्वारे पालावरील शाळा (बालसंस्कार केंद्र) चालविले जाते. या बालकांच्या शिक्षण, आरोग्य, संस्कार व मूल्य रुजविण्याचे कार्य बालसंस्कार केंद्र करीत आहे. समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहयोगाने उपेक्षित वंचित समूहाच्या मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध दुर्गम वस्त्या, पालावर बालसंस्कार केंद्र चालविली जात असल्याचे सामाजिक कार्यकर्ते युवराज गुंड यांनी सांगितले. पांडुळे म्हणाल्या की, समाजातील उपेक्षित मुलांसाठी कार्य करणाऱ्या या उपक्रमास नेहमीच योगदान राहणार आहे. वंचितांच्या सेवेतच जीवनाचे समाधान आहे. यावेळी बालकांना शालेय साहित्य, खाऊ व कपड्यांचे ही वाटप करण्यात आले.
------------
फोटो - १०केअरिंग फेंडस
फकीरवाडा येथील समानता वस्तीस्तर संघाच्या वतीने टाकळी काझी येथील बहुरूपी वस्तीवरील मुलांना शालेय साहित्य, मिठाई व कपड्यांचे वाटप करण्यात आले.