शनिभक्तांना संक्रांतीनिमित्त तीळगूळ, वाण वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:23 AM2021-01-16T04:23:48+5:302021-01-16T04:23:48+5:30
नेवासा : संक्रांत सणानिमित्त शनिशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने महिला शनिभक्तांना तीळगूळ, प्रसाद व वाण वाटप करण्यात आले. ...
नेवासा : संक्रांत सणानिमित्त शनिशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने महिला शनिभक्तांना तीळगूळ, प्रसाद व वाण वाटप करण्यात आले.
या उपक्रमाचे ग्रामस्थांनी स्वागत केले. शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त सुनीता विठ्ठल आढाव व अध्यक्ष भागवत बानकर यांच्या पत्नी ज्योती बानकर यांनी शनिमूर्तीचे पूजन केले. यावेळी मनीषा अशोक बानकर, वर्षा आदिनाथ बानकर उपस्थित होत्या. ग्रामस्थ महिलांनी शनीदेवाला सुगड्यातील ववसा वाहून दर्शन घेतले.
उदासी महाराज मठात महिला विश्वस्त आढाव यांनी महिला भाविक गायत्री दीपक मराठे, अश्विनी राहुल मराठे, नंदिनी धनंजय मराठे, सुशीला चंद्रकांत मराठे यांना वाण म्हणून ‘शनिमाहात्म्य’ पुस्तक देऊन तीळगूळ वाटप केले. संक्रांत सणानिमित्त परिसरातील सर्व मंदिरांत ग्रामस्थ, महिलांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
फोटो १४ शनिशिंगणापूर
नेवासा येथे मकर संक्रांतीनिमित्त शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या
वतीने महिला भाविकांना वाण म्हणून ‘शनिमाहात्म्य’ पुस्तक भेट देताना विश्वस्त सुनीता आढाव.