हातावर पोट असलेल्या कष्टकऱ्यांना छत्री, मास्कचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:19 AM2021-04-06T04:19:56+5:302021-04-06T04:19:56+5:30

शहरातील माळीवाडा बस स्थानक व जुनी महापालिका येथील रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यांना या साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी रोटरी इंटिग्रिटीचे ...

Distribution of umbrellas and masks to laborers with stomachs on their hands | हातावर पोट असलेल्या कष्टकऱ्यांना छत्री, मास्कचे वाटप

हातावर पोट असलेल्या कष्टकऱ्यांना छत्री, मास्कचे वाटप

शहरातील माळीवाडा बस स्थानक व जुनी महापालिका येथील रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यांना या साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी रोटरी इंटिग्रिटीचे अध्यक्ष रफिक मुन्शी, सचिव सुयोग झंवर, नगरसेवक आसिफ सुलतान, उद्योजक अफजल शेख, डॉ. रिजवान अहेमद, अय्युब खान आदींसह रोटरीचे सदस्य उपस्थित होते. यावेळी आ. जगताप म्हणाले मागील वर्षी झालेल्या टाळेबंदीत हातावर पोट असलेल्या कष्टकरी बांधवांचा उदरनिर्वाहाचा बिकट प्रश्‍न निर्माण झाला होता. त्यांना रोटरी सारख्या विविध सामाजिक संघटनांनी आधार देण्याचे कार्य केले. सध्या देखील कोरोनाचे संक्रमण व उन्हाची तीव्रता वाढत असताना हातावर पोट असलेल्या कष्टकरी बांधव घटक दुर्लक्षित राहू नये या भावनेने रोटरी इंटिग्रिटीच्यावतीने घेतलेला उपक्रम प्रेरणादायी आहे.

रोटरी इंटिग्रिटीचे अध्यक्ष रफिक मुन्शी म्हणाले कष्टकरी बांधव मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने त्यांचे ऊन, पाऊस व कोरोनापासून संरक्षण होण्यासाठी रोटरी इंटिग्रिटीच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. शहरातील विविध ठिकाणी असलेल्या कष्टकरी बांधवांना छत्री व मास्क देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

------

फोटो -०५ रोटरी क्लब

ओळी- वाढते ऊन व कोरोना संक्रमणाच्या संरक्षणासाठी रोटरी क्लब ऑफ अहमदनगर इंटिग्रिटीच्या वतीने शहरातील हातावर पोट असलेल्या कष्टकरी बांधवांना छत्री व मास्क वाटप आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.

Web Title: Distribution of umbrellas and masks to laborers with stomachs on their hands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.