जिल्हा बँकची शाखा, सेवा संस्थेतही ग्राहकांची झुंबड,पोलिस प्रशासन हतबल,पेट्रोल पंपावरही रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 01:44 PM2020-04-19T13:44:30+5:302020-04-19T13:45:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क टाकळी ढोकेश्वर : कोरोना लॉकडाऊनचा सर्वसामान्यांना मोठा फटका बसत आहे. पेट्रोल, बँका, विविध कार्यकारी सेवा संस्था यांच्या कार्यालयांच्या वेळेच बंधन असल्यामुळे ग्रामिण भागातील पेट्रोल पंपासह बँका व सेवा संस्थांसोमरही ग्राहकांची झुंबड उडाली आहे. नागरिकांना घरी बसा हे सांगत पोलिस प्रशासनही चांगलेच हतबल झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
टाकळी ढोकेश्वर : कोरोना लॉकडाऊनचा सर्वसामान्यांना मोठा फटका बसत आहे. पेट्रोल, बँका, विविध कार्यकारी सेवा संस्था यांच्या कार्यालयांच्या वेळेच बंधन असल्यामुळे ग्रामिण भागातील पेट्रोल पंपासह बँका व सेवा संस्थांसोमरही ग्राहकांची झुंबड उडाली आहे. नागरिकांना घरी बसा हे सांगत पोलिस प्रशासनही चांगलेच हतबल झाले आहे.
टाकळी ढोकेश्वर(ता.पारनेर)येथील पेट्रोल पंपाची चालू राहण्याची वेळ सकाळी ५ ते सकाळी ९ वाजेपर्यंत आहे. टाकळी ढोकेश्वर हे ३५ ते ४० गावांची बाजारपेठ असल्याने पेट्रोल भरण्यासाठी ग्राहकांना तीस ते ४० किलोमीटर वरून यावे लागते आहे. या पेट्रोल पंपावर सकाळी ७ ते ७:३० वाजण्याच्या दरम्यान अर्धा ते एक किलोमीटर रांगा लागत आहे. दुसरीकडे शासनाने सुरू केलेल्या संजय गांधी व श्रावणबाळ या योजनांच्या माध्यमातून एक हजार रुपये मानधन काढण्यासाठी ग्रामिण भागातील वृध,अपंग,विधवा सह विविध लाभधारक जिल्हा बँकेच्या शाखांपुढे गर्दी करत आहेत. तिसरीकडे शासनाने लॉकडाऊनमुळे गोरगरिबांसाठी स्वस्त धान्य दुकानांमार्फत माणसी ५ किलो धान्य वाटप सुरू केले आहे. यासाठीही लांबच लांब रांगा लागत आहेत. पोलिसांना याचा अतिरीक्त ताण वाढला आहे. नियोजनाअभावी ग्राहकांची झुंबड उडाली आहे.
---
लॉकडाऊनमध्ये प्रशासनाची दमछाक...!
पारनेर तालुका क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा असल्याने पारनेर तालुक्याचा विचार करता व गुन्हयांचे प्रमाण पाहता पोलिसांवर मोठा ताण पडत आहे. पारनेर तालुक्यातील जनतेने गरज नसताना बाहेर न पडता घरात राहून पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन पारनेरचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी केले आहे.
फोटो- १८ टाकळी ढोकेश्वर १, १८टाकळी ढोकेश्वर २
टाकळी ढोकेश्वर(ता.पारनेर)येथील जिल्हा बँकेच्या शाखेत पैसे काढण्यासाठी ग्राहकांच्या रंग लागल्या असून गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे दिसते आहे. दुसºया छायाचित्रात पेट्रोल पंपावरही लांबच लांब रांगा लागल्या आहेत.