जिल्हा बँकेच्या मतदानाची तयारी अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:22 AM2021-02-16T04:22:11+5:302021-02-16T04:22:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : जिल्हा बँकेच्या चार जागांसाठी येत्या शनिवारी मतदान होत असून, जिल्ह्यातील १७ मतदान केंद्रांवर मतदान ...

District Bank voting preparations in final stage | जिल्हा बँकेच्या मतदानाची तयारी अंतिम टप्प्यात

जिल्हा बँकेच्या मतदानाची तयारी अंतिम टप्प्यात

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : जिल्हा बँकेच्या चार जागांसाठी येत्या शनिवारी मतदान होत असून, जिल्ह्यातील १७ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात येणार आहे. निवडणूक आचारसंहिता कक्षही स्थापन करण्यात आला आहे.

जिल्हा बँकेच्या २१ पैकी १७ जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित कर्जत, पारनेर आणि नगर तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघात मतदान होत आहे. बिगर शेती मतदारसंघात १ हजार ३७६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

जिल्ह्यातील नगर, पारनेर आणि कर्जत तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघात प्रत्येकी तीन मतदार केंद्र असणार आहेत. बिगर शेतीपुरक मतदारसंघ निवडणुकीसाठी १४ तालुक्यांत प्रत्येकी एक, असे १७ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान केंद्र स्थापन करण्यात आले असून, एक दिवशी आधी शुक्रवारीच केंद्र प्रमुखांसह अधिकारी व कर्मचारी तालुक्यांत रवाना होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

...

असे आहेत, मतदार

कर्जत- ७४, पारनेर- १०५, नगर-१०९, बिगर शेती मतदारसंघ- १,३७६

Web Title: District Bank voting preparations in final stage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.