जिल्हा सहकारी बॅंक: राहुल जगताप बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 02:02 PM2021-02-11T14:02:27+5:302021-02-11T14:02:35+5:30
अहमदनगर: अहमदनगर जिल्हा बँकेच्या विकास सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून भाजप मात्र संघातून वैभव पांडुरंग पाचपुते व प्रवीण कुरुमकर यांनी माघार घेतल्याने माजी आमदार राहुल जगताप बिनविरोध संचालक झाले आहेत.
अहमदनगर: श्रीगोंदा तून राहुल जगताप बिनविरोध अहमदनगर जिल्हा बँकेच्या विकास सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून भाजप मात्र संघातून वैभव पांडुरंग पाचपुते व प्रवीण कुरुमकर यांनी माघार घेतल्याने माजी आमदार राहुल जगताप बिनविरोध संचालक झाले आहेत.
अकोल्यातील राजकारण फिरले
जिल्हा बँक निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी माजी आमदार वैभव पिचड यांनी आपला अनुसूचित जाती व बिगर शेती मतदारसंघातून उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. अकोले तालुक्यातुन जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर हे राष्ट्रवादी च्या मदतीने बिनविरोध होण्याची शक्यता असून, भांगरे यांनाही इतर मागास प्रवर्गातून निवडणूक मैदानात उतरविण्यात आले आहे. अकोले तालुक्यात पिचड यांना थांबविण्यात आले आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने महसूल मंत्री बाळासाहेब थोरात मंत्री प्राजक्त तनपुरे हे आशुतोष काळे यांच्या लता-कुंज बंगल्यावर दाखल झाले असून त्या ठिकाणाहून उमेदवारांशी चर्चा करून माघारी ते घेण्याबाबत सूचना केल्या जात आहेत. तसेच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके यांच्या बंगल्यावर राष्ट्रवादीचे माजी आमदार नरेंद्र घुले पाटील ,जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके ,आमदार सुधीर तांबे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित आहे.नेत्यांचा निरोप येताच उमेदवारी अर्ज मागे घेणे तसेच कुणाला कोणत्या मतदारसंघातून पाठवायचे याबाबतचे चर्चा सुरू आहे. आत्तापर्यंत माजी आमदार वैभव पिचड यांचा एकमेव अर्ज माघारी घेण्यात आला आहे. श्रीगोंदा तालुक्यातून वैभव पाचपुते की राहुल जगताप याबाबत यावर अजून एकमत झालेले नाही. कर्जत तालुक्यातून अंबादास पिसाळ व मीनाक्षी सोळुंके याचाही निर्णय अजून झालेला नाही श्रीरामपूर तालुक्यातून करण ससाने व भानुदास मुरकुटे यांचा उमेदवारी अर्ज दाखल आहे .भानुदास मुरकुटे यांचे चिरंजीव सिद्धार्थ मुरकुटे हे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसोबत आहेत त्यामुळे मुरकुटे हे आता महाविकास आघाडीत सामील झाल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.
खासदार सुजय विखे यांची घाटात बैठक सुरू
जिल्हा बँकेच्या निवडणूक या पार्श्वभूमीवर डॉक्टर खासदार सुजय विखे यांची यांच्या विलाद घाट वेळ घाटात बैठक सुरू आहे अद्याप एकाही जागेबाबत निर्णय झालेला नाही तिन्ही गटांच्या तीन ठिकाणी बैठका सुरू आहेत राष्ट्रवादी उपाध्यक्षांच्या