जिल्हाधिकाऱ्यांची कोळगावच्या कोविड सेंटरला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:20 AM2021-05-10T04:20:56+5:302021-05-10T04:20:56+5:30
विसापूर : रविवारी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी कोळगाव (ता.श्रीगोंदा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व कोळाईदेवी विद्यालयात सुरू करण्यात आलेल्या ...
विसापूर : रविवारी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी कोळगाव (ता.श्रीगोंदा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व कोळाईदेवी विद्यालयात सुरू करण्यात आलेल्या कर्मवीर भाऊराव पाटील कोविड सेंटरला भेट देऊन पाहणी केली.
या ठिकाणी रविवारी सुट्टी असताना आरोग्य कर्मचारी उपस्थित राहून रुग्णांची काळजी घेत असल्याचे चित्र पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. यापुढे दैनंदिन आरटीपीसीआर कोविड टेस्टच्या संख्या वाढवण्याच्या सूचना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपस्थित असलेल्या आरोग्य अधिकारी डॉ. प्राजक्ता निमसे यांना केल्या. काही रुग्णांच्या नातेवाइकांनी श्रीगोंदा येथे उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या जवळ असलेल्या नातेवाइकांना जेवण पाठविण्यात येत असलेल्या अडचणी सांगितल्या. यावेळी रुग्णांचे जवळ असणाऱ्या नातेवाइकांना जेवण पुरविण्याबाबत विचार करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले. कोळगाव येथील कोळाईदेवी विद्यालयात ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून सुरू केलेल्या कर्मवीर भाऊराव पाटील कोविड सेंटरला त्यांनी भेट दिली.या ठिकाणी ग्रामस्थांनी केलेली व्यवस्था पाहून त्यांनी कौतुक केले.या ७५ बेडच्या कोविड सेंटरमध्ये ७४ रुग्ण उपचार घेत आहेत. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती षुरुषोत्तम लगड, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार प्रदीप पवार, गटविकास अधिकारी प्रशांत काळे उपस्थित होते.