नगरमधील १३ जणांसह जिल्ह्यात १६ जणांची कोरोनावर मात, ५५ जणांचे अहवाल निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 11:30 AM2020-06-30T11:30:09+5:302020-06-30T11:30:16+5:30
अहमदनगर: नगर शहरातील १३ जणांसह जिल्ह्यात आज १६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये ८० वर्षांचे वृद्ध आणि दोन वर्षाच्या चिमुकल्याचाही समावेश आहे. त्यामुळे उपचार घेत असलेल्यांची रुग्णसंख्या ही फक्त १०१ इतकी आहे.

८० वर्षांचे वृद्ध आणि दोन वर्षांच्या चिमुकलीसह अहमदनगर जिल्ह्यात आज १६ रुग्णांची कोरोनावर मात केली आहे. नगर शहरातील १३ आणि संगमनेर, जामखेड, अकोले तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णालाही आज घरी सोडण्यात आले.
जिल्ह्यात एकूण बरे झालेले रुग्ण संख्या आता ३०७ झाली असून उपचार घेत असलेल्या अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या ही १०१ इतकी झाली आहे. दरम्यान, आज सकाळी ५५ व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले असून हे सर्व अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.