१४ शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्कार : आज वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 11:28 AM2018-09-05T11:28:49+5:302018-09-05T11:29:04+5:30

जिल्हा परिषदेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी जिल्ह्यातील उपाध्यापक, पदवीधर १४ शिक्षकांना मंगळवारी जाहीर झाला.

District Teacher Award for 14 teachers: Distribution today | १४ शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्कार : आज वितरण

१४ शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्कार : आज वितरण

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी जिल्ह्यातील उपाध्यापक, पदवीधर १४ शिक्षकांना मंगळवारी जाहीर झाला. जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते आज पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्कराचे स्वरुप आहे.
जिल्हा शिक्षक पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्षा शालिनी विखे यांनी वरील पुरस्कराची घोषणा केली. यंदाच्या जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी प्रत्येक तालुक्यातून एका शिक्षकाची निवड करण्यात आली असून, याशिवाय एका केंद्र प्रमुखाचाही पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे. जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी जिल्हा परिषदेने आॅनलाईन अर्ज मागविले होते. तालुक्यातून प्राप्त अर्जांची छाननी गट शिक्षणअधिका-यांमार्फत करण्यात आली. छाननीत पात्र ठरलेल्या शिक्षकांचे तालुकास्तरीय समितीकडून मूल्यमापन करण्यात आले. जिल्ह्यात एकूण १४ तालुके आहेत. तालुकास्तरावर मूल्यमापन केलेल्या शिक्षकांचे अहवाल बंद पाकिटात जिल्हा परिषदेला सादर करण्यात आले.

शिक्षकांची २५ गुणांची लेखी परीक्षा
शिक्षकांची २५ गुणांची लेखी परीक्षा घेण्यात आली़ लेखी परिक्षेची उत्तरपत्रिका तपासून यादी जिल्हा निवड समितीसमोर सादर करण्यात आली़ जिल्हा निवड समितीने मूल्यमापनासह लेखी परिक्षेतील गुणांच्या आधारे जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी शिक्षकांची निवड केली आहे़ केंद्रप्रमुखांतून एकास पुरस्कार दिला जातो़ या पुरस्करासाठी एकमेव मंगल चंद्रकांत महामुनी यांचा अर्ज प्राप्त झाला होता़ त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले़

पुरस्कारार्थी शिक्षक तालुकानिहाय
अकोले- सुनीता प्रभाकर वाल्टे, (उपाध्यापक, पानसरवाडी)
संगमनेर- दिगंबर सोमनाथ फटांगरे (उपाध्यापक, धुमाळवाडी)
कोपरगाव-सुधाकर दत्तात्रय निकुंभ (उपाध्यापक, डाऊच)
राहाता- मिलिंद आनंद खंडीझोड (उपाध्यापक, रामपूरवाडी)
श्रीरामपूर-राजू विठ्ठल भालेराव (उपाध्यापक, माळेवाडी)
राहुरी- विजय केशव कांडकर (उपाध्यापक, करपरावाडी)
नेवासा-बाळकृष्ण मुधकर मुळे (उपाध्यापक, नजिक चिंचोली)
शेवगाव-शुभांगी भाऊसाहेब शिलार (उपाध्यापक, शेवगाव)
पाथर्डी- शहादेव बाबासाहेब काळे (पदवीधर, अकोले)
जामखेड- रत्नमाला सखाराम खुटे (उपाध्यापक, इंदिरानगर)
कर्जत- प्रितम दत्तात्रय गुरव (पदवीधर, दुधोडी)
श्रीगोंदा- भाऊसाहेब बन्सी दातीर (पदवीधर, शेडगाव)
पारनेर- मंगेश वसंत खिलारी (उपाध्यापक, टाकळीढोकेश्वर)
नगर- लक्ष्मण रंगनाथ टिमकरे (मुख्याध्यापक, जेऊर)

Web Title: District Teacher Award for 14 teachers: Distribution today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.