पुढील पाच दिवस जिल्हा कोरडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 04:19 PM2018-08-05T16:19:46+5:302018-08-05T16:19:52+5:30
अवर्षणग्रस्त असलेल्या अहमदनगर जिल्ह्याला यंदा पावसाअभावी बुरे दिन आले आहेत. येत्या पाच दिवसात पाऊस विश्रांती घेणार असल्याचा अंदाज राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे खरीप हंगाम वाया गेल्यात जमा आहे.
राहुरी : अवर्षणग्रस्त असलेल्या अहमदनगर जिल्ह्याला यंदा पावसाअभावी बुरे दिन आले आहेत. येत्या पाच दिवसात पाऊस विश्रांती घेणार असल्याचा अंदाज राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या हवामान खात्याने व्यक्त केला आहे़ त्यामुळे खरीप हंगाम वाया गेल्यात जमा आहे़
यंदा सरासरी इतका पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता़ मात्र प्रत्यक्षात दोन सव्वादोन महिन्यात पावसाने ठेंगा दाखविल्याने अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या झोपा उडाल्या आहेत़ मुळा व भंडारदरा या धरणाशिवाय छोट्या, मोठ्या धरणात समाधानकारक पाणी साठा असला तरी पावसाने दडी मारली आहे़ याशिवाय जायकवाडीला पाणी जाण्याची भीती शेतकºयांना आहे़ दुसºया बाजूला ढगाळ हवामानामुळे पिकांवर रोग व किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे़ हवामानावर आधारित विद्यापीठाने शेतकºयांना सल्ला दिला आहे़ लाल बोंडअळी आढळून आल्यास कामगंध सापळे लावण्याचा शेतकºयांना सल्ला देण्यात आला आहे़ तापमान व आर्द्रतेच्या वाढीमुळे मूग व उडीद पिकांवर मावा, तुडतुडे व पांढरी माशी आढळून आल्यास डायमेथोएट ३० टक्के प्रवाही अथवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५ टक्के प्रवाही १० मिली अथवा मिथील डिमेटॉन २५ टक्के प्रवाही ८ मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे असा सल्ला विद्यापीठाने दिला आहे़
सोयाबीन पिकावर खोडमाशीचा प्रादूर्भाव आढळून आल्यास १२ मिली ट्रायझोफॉस ४० टक्के प्रवाही प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे़ तूर या पिकावर शेंडे गुंडाळणारी अळी व पाने कुडतडणाºया अळीचा प्रादूर्भाव आढळून आल्यास क्विनॉलफॉस २५ टक्के प्रवाही १६ मिली किंवा इंडोक्झाकार्ब १४़५ टक्के प्रवाही ७ मिली किंवा स्पीनोसॅड ४५ टक्के प्रवाही तीन मिली प्रती १० लिटर पाण्यातून फवारावे़
पावसाने ओढ दिल्याने पिके सुकली
बोटा : पावसाने ओढ दिल्याने संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील साकूर व परिसरातील गावांमध्ये खरीप हंगामातील पिकांसह माळरानावर चाराही सुकू लागल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
पठारभागात सुरवातीला वळवाचा दमदार पाऊस झाला. मोसमी पावसाचे आगमन लांबले. यानंतर झालेल्या समाधानकारक पावसाचे ओलीवर बोटा, घारगाव, साकूर व इतर गावांमध्ये शेतकरी वर्गाने खरीप हंगामातील बाजरी, भुईमूग, मूग आदींसह कडधान्ये या पिकांच्या पेरण्या उरकल्या. सारोळेपठार नांदुर-खंदरमाळ व लगतच्या गावामध्ये लाल सेद्रीय कांदा पिकांच्या पेरण्याही झाल्या.
दरम्यान पठारभागातील बहुतांश क्षेत्र हे पावसावरच अवलंबून आहे. त्यातच पावसाने काही दिवसांपासून ओढ दिल्याने साकूर उत्तर भागातील खांबे, वरवंडी, कौठे, मलकापूर, हिवरगाव पठार, रणखांब व लगतच्या गावांमध्ये खरीप पिके सुकू लागली आहेत. माळरानावरील चाराही सुकू लागला आहे.
यामुळे या गावांमधील शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. तर मुळा नदी परिसर व बोटा, घारगाव परिसरातील पिक परिस्थिती समाधानकारक असली तरी येत्या काही दिवसात पाऊस न झाल्यास खरीप हंगामावरच परिणाम होण्याची शक्यता आहे.
भारत मौसम विज्ञान विभागाच्या अंदाजानुसार अहमदनगर जिल्ह्यात पुढील पाच दिवस कमाल तापमान २८ ते २९ अंश सेल्सीअस राहील़ किमान तापमान १९ ते २० अंश सेल्सीअस राहील़ आकाश अंशत: ढगाळ राहील़ कमाल आर्द्रता ८८ ते ९० टक्के राहील़ किमान आर्द्रता ७१ ते ७३ टक्के राहील़ वाºयाचा ताशी वेग १३ ते १६ किलोमीटर राहील़ -रवींद्र आंधळे, सहयोगी प्राध्यापक, हवामान विभाग, महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी.