समुद्राला वाहून जाणारे पाणी वळवा; खासदार लोखंडेंची हिवाळी अधिवेशनात मागणी
By शिवाजी पवार | Published: December 7, 2023 02:46 PM2023-12-07T14:46:44+5:302023-12-07T14:47:25+5:30
खासदार सदाशिव लोखंडे : संसदेच्या अधिवेशनात मागणी
श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : घाटमाथ्याच्या पश्चिमेला वाहून जाणारे गोदावरी खोऱ्यात वळवावे अशी मागणी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी संसदेच्या अधिवेशनात केली. निळवंडे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मदत केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे खासदार लोखंडे आभार व्यक्त केले.
लोखंडे म्हणाले, २००५ मध्ये झालेला समन्यायी पाणी वाटप कायदा हा काळा कायदा असून नगर व नाशिक जिल्ह्यावर अन्याय करणारा आहे. येथील शेतकऱ्यांवर तेव्हाच्या काँग्रेस सरकारने व नेत्यांनी मोठा अन्याय केला. यातून जर मार्ग काढायचा असेल तर पश्चिमेला समुद्रात वाहून जाणारे पाणी नगर व मराठवाड्याच्या जिरायती भागात वळवावे लागेल. यासाठी केंद्र सरकारने तात्काळ राज्य सरकारला निर्देश देत प्रस्ताव पाठविण्यासाठी सांगावे, अशी विनंती खासदार लोखंडे यांनी लोकसभा अध्यक्षांकडे केली.