जिल्हा सदिच्छा मंडळाला भगदाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:20 AM2021-01-25T04:20:50+5:302021-01-25T04:20:50+5:30
अहमदनगर : शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष व सदिच्छा मंडळाचे नेते गोकुळ कळमकर, रमेश धोंगडे यांच्यासह जिल्ह्यातील सदिच्छा मंडळाचे विविध ...
अहमदनगर : शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष व सदिच्छा मंडळाचे नेते गोकुळ कळमकर, रमेश धोंगडे यांच्यासह जिल्ह्यातील सदिच्छा मंडळाचे विविध तालुक्यांतील पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (दि.२३) बापूसाहेब तांबेप्रणीत गुरुमाउली मंडळात प्रवेश केल्याने सदिच्छा मंडळाला मोठे भगदाड पडले आहे.
यात सदिच्छांचे पदाधिकारी कारभारी बाबर, यादव सिनारे, गौतम साळवे, कैलास शिंदे, रवींद्र रोकडे, छाया पवार, प्रज्ञा भोसले, मीनाक्षी अवचरे, अश्फाक शेख, केरु डोके, अजय सोनवणे संतोष मगर, दत्ता लामखडे, रामकृष्ण मेहेत्रे, अरुण फंड, संतोष मगर, राजू आतार आदींचा समावेश आहे. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षकसंघाचे सरचिटणीस आप्पासाहेब कुल हे होते. यावेळी गुरुमाउली मंडळाचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब तांबे, राज्यसंघाचे उपाध्यक्ष दत्ता पाटील कुलट, शिक्षक बँकेचे अध्यक्ष राजू राहणे, उपाध्यक्षा उषा बनकर, कार्याध्यक्ष बाळासाहेब सरोदे, विठ्ठल फुंदे, संदीप मोटे, पी. डी. सोनवणे, राजू साळवे, मोहनराव पागिरे, शकिल बागवान आदी उपस्थित होते.
कळमकर म्हणाले, २५ वर्षे सदिच्छा मंडळांमध्ये काम केले. आता सदिच्छा मंडळाची सूत्रे सर्व संघटना फिरून आलेल्या व्यक्तीच्या हाती गेली असून, त्यांच्या मनमानीने सदिच्छा मंडळ संपण्याची वेळ आली आहे. शिक्षक बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाचा कारभार अतिशय चांगला चालू असून, बापूसाहेब तांबे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा गुरुमाउली मंडळच बँकेमध्ये निवडून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जिल्हा संघाचे व गुरुमाुली मंडळाचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब तांबे म्हणाले, बँकेचे संचालक मंडळ अतिशय काटकसरीने कारभार करीत असून, २ टक्केच्या फरकाने सुरू असलेला कारभार राज्यासाठी दिशादर्शक ठरला आहे. सातारा बँकेच्या निवडणुकीमध्ये नगर बँकेचे उदाहरण दिले गेले, ही बँकेसाठी अभिमानास्पद बाब असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमास शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष शरद सुद्रिक, संतोष दुसुंगे, बाळासाहेब मुखेकर, अर्जुन शिरसाट, किसन खेमनर, बाबा खरात, राजेंद्र सदगीर, भाऊराव राहिंज, राम वाकचौरे, बाळू कापसे, विजय नरवडे, रामेश्वर चोपडे, सुनील गायकवाड, किशोर माकोडे, पांडुरंग खराडे, शशिकांत जेजूरकर, ज्ञानेश्वर शिरसाट, रमेश गोरे, संतोष राऊत, किसन वराट, आदिनाथ सातपुते, आर. टी. साबळे, विश्वस्त रमेश धोंगडे, बाळासाहेब सालके, अण्णासाहेब आभाळे, महेश भणभणे, संतोष वाघमोडे, श्याम पटारे, शिवाजी भालेराव, राजू इनामदार, संतोष साबळे, शुभांगी निकम, कल्पना पडवळ आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन मंगेश खिलारी यांनी केले, तर आभार राजू राहणे यांनी मानले.