दिव्यांग तरुणाचा मुळा नदीपात्रात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 04:46 PM2020-05-11T16:46:44+5:302020-05-11T16:47:32+5:30
मुळा नदीपात्रातील डोहात पाय घसरून पडल्याने एका दिव्यांग तरुणाचा बुडून मृत्यू झाला. येथील कोतूळेश्वर मंदिराजवळ रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. भाऊराव गणपत मेंगाळ (वय २८)असे मयत तरुणाचे नाव आहे.
कोतूळ : मुळा नदीपात्रातील डोहात पाय घसरून पडल्याने एका दिव्यांग तरुणाचा बुडून मृत्यू झाला. येथील कोतूळेश्वर मंदिराजवळ रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. भाऊराव गणपत मेंगाळ (वय २८)असे मयत तरुणाचे नाव आहे.
कोतूळ येथील मुळा नदीपात्रात रविवारी दुपारी चार ते पाचच्या दरम्यान संगमनेर तालुक्यातील सावरचोळ (मेंगाळवाडी) येथील पाच ते सहा लोक मासे पकडण्यासाठी कोतूळेश्वर मंदिर परिसरातील दवडोहात आले होते. दरम्यान भाऊराव हा पायाने अपंग असल्याने तो डोहाच्या कडेला मोठ्या दगडावर बसला होता. सोबतचे इतर लोक काही अंतरावर मासे पकडण्यासाठी दूरपर्यंत गेले. ते परत आले असता भाऊसाहेब हा जागेवर आढळला नाही. त्याच्या जवळचे साहित्य जागेवरच होते. सभोवताली पाहिले असता तो नदीपात्रात मृत अवस्थेत आढळून आला. अकोलेचे पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांनी घटनास्थळी भेट दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील साळवे, विजय खुळे यांनी घटनेची आकस्मात मृत्युची नोंद केली आहे.