दिव्यांगांचा राज्यस्तरीय दिव्यांगरत्न पुरस्कार देऊन गौरव

By | Published: December 8, 2020 04:18 AM2020-12-08T04:18:25+5:302020-12-08T04:18:25+5:30

जागतिक दिव्यांग दिन सप्ताहानिमित्त या दिव्यांग गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्थतज्ज्ञ दत्तात्रय काटे होते. दिव्यांगांचे ...

Divyangaratna honored with state level Divyangaratna award | दिव्यांगांचा राज्यस्तरीय दिव्यांगरत्न पुरस्कार देऊन गौरव

दिव्यांगांचा राज्यस्तरीय दिव्यांगरत्न पुरस्कार देऊन गौरव

जागतिक दिव्यांग दिन सप्ताहानिमित्त या दिव्यांग गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्थतज्ज्ञ दत्तात्रय काटे होते. दिव्यांगांचे प्रेरणास्थान असलेल्या डॉ. हेलन केलर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी शेवगाव पंचायत समिती सभापती क्षितिज घुले, सावली संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे, उपाध्यक्ष चांद शेख, सचिव नवनाथ औटी, बाहुबली वायकर, सुनील वाळके, मनोहर मराठे, खलील शेख, गणेश महाजन आदी उपस्थित होते.

काटे म्हणाले, अनेक दिव्यांगांनी परिस्थितीवर मात करून विविध क्षेत्रात यशोशिखर गाठले आहे. निसर्गाने काही कमी दिले असले, तरी काही अधिकदेखील दिलेले असते. आपल्यातील विशेष गुण ओळखण्याची गरज आहे. आज परिस्थिती बिकट बनत असताना, शासनानेदेखील दिव्यांगांच्या प्रश्‍नांकडे लक्ष देण्याची गरज आहे.

संस्थेचे उपाध्यक्ष चांद शेख यांनी सावली दिव्यांग संस्थेच्या वतीने सुरू असलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिली. प्रास्ताविक मनोहर मराठे यांनी, तर सूत्रसंचालन सुरेखा खेडकर यांनी केले. आभार संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे यांनी मानले.

.................

फोटो मेल दिव्यांग पुरस्कार

सावली दिव्यांग कल्याणकारी बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रतिभावंत दिव्यांग व्यक्तींना राज्यस्तरीय दिव्यांगरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

Web Title: Divyangaratna honored with state level Divyangaratna award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.