करंजी घाटात प्रवाशांची ‘दिवाळी’ : माणुसकीला काळीमा फासणारी घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 11:18 AM2018-10-27T11:18:38+5:302018-10-27T11:18:45+5:30

तेलाचे डबे भरून मुंबईहून जालन्याकडे चाललेल्या ट्रकला नगर -पाथर्डी महामार्गावरील करंजी घाटात पलटी झाला.

'Diwali' for travelers in Karanjali Ghat: An incident involving human rights | करंजी घाटात प्रवाशांची ‘दिवाळी’ : माणुसकीला काळीमा फासणारी घटना

करंजी घाटात प्रवाशांची ‘दिवाळी’ : माणुसकीला काळीमा फासणारी घटना

ठळक मुद्देतेलाचा ट्रक उलटला, चालक ठार

करंजी : तेलाचे डबे भरून मुंबईहून जालन्याकडे चाललेल्या ट्रकला नगर -पाथर्डी महामार्गावरील करंजी घाटात पलटी झाला. यात ट्रकचा चालक खाली अडकला. मदतीसाठी तो याचना करित असताना येणा-या-जाणा-या प्रवाशांनी माणुसकी न दाखविता तेलाचे डबे लांबविले. प्रवाशांनी चालकाला मदत न केल्यामुळे चालक जागीच ठार झाला. ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना शुक्रवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास कंरजी घाटात घडली.
मुंबईहून तेलाचे डबे, पिशव्या, खोके घेवून जालन्याकडे जात असलेला (एम.एच -२०, ए.टी.-२३६३) ट्रक नगर-पाथर्डी महामार्गावरील करंजी घाटातील अवघड वळणावर अंदाज न आल्याने पलटी झाला. ट्रक पलटी झाल्याने ट्रक ड्रायव्हर संदिप टेकाळे हा ट्रकखाली दबला होता. घटनेची खबर ग्रामस्थांना समजताच घटनास्थळी जावून गावातील युवकांनी तेलाच्या डब्याने भरलेला ट्रक खाली करून ट्रक ड्रायव्हरला वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु ट्रक ड्रायव्हर जागीच ठार झाला. मात्र मदतकार्य चालू असताना येणा-या -जाणा-या प्रवाशांनी वाहनातून तेलाच्या डब्याची, खोक्यांची अक्षरश: लूट केली. त्याच्याबरोबर असलेला ट्रक मालक शाम हरिश्चंद्रे मात्र या अपघातातून सुखरूप बचावला. ट्रक रस्त्यातच पलटी झाल्याने घाटात मोठ्या प्रमाणात वाहनाची गर्दी झाली. ग्रामस्थ मदतकार्य करित असताना येणा-या -जाणा-या प्रवाशांनी ट्रकखाली सापडलेल्या ड्रायव्हरला वाचविण्याऐवजी तेलाचे डबे, खोके अक्षरश: लुटले. ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. घाटाच्या खाली महामार्ग वाहतूक नियंत्रण शाखेची चौकी आहे, मात्र दीड तास या अपघाताकडे कुणीही आले नाही. त्यामुळे ग्रामस्थांत, प्रवाशांत संताप व्यक्त केला जात होता.

Web Title: 'Diwali' for travelers in Karanjali Ghat: An incident involving human rights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.