वित्त मंत्रालयाकडून ज्ञानेश्वर कारखान्याचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:26 AM2021-07-07T04:26:56+5:302021-07-07T04:26:56+5:30
भेंडा : लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात ३१ मार्च २०२१ अखेर ...
भेंडा : लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात ३१ मार्च २०२१ अखेर जीएसटी कर प्रणालीत नियमित भरणा केल्यामुळे त्यांची दखल घेऊन भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाचे केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क मंडळाने कारखान्याला सर्टिफिकेट ऑफ अप्रेसिएशन प्रमाणपत्र प्रदान करून सन्मान केला आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळाचे अध्यक्ष एम. अजितकुमार यांनी हे प्रमाणपत्र प्रदान केले असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष नरेंद्र घुले पाटील यांनी दिली.
नियमित जीएसटी वेळेत भरणा करणे कामी लेखापाल शैलेंद्र जैस्वाल, कारखान्याचे ज्येष्ठ लेखापाल नामदेव शिंदे, सहायक लेखापाल रमेश शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या कामाबद्दल कारखान्याचे अध्यक्ष नरेंद्र घुले, संचालक चंद्रशेखर घुले, उपाध्यक्ष पांडुरंग अभंग, तज्ज्ञ संचालक डॉ. क्षितिज घुले, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, सचिव रवींद्र मोटे, मुख्य लेखापाल रामनाथ गरड आदींनी कौतुक केले.