ज्ञानेश्वरी: भावनेचा फुलोरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 05:16 PM2019-12-29T17:16:08+5:302019-12-29T17:23:01+5:30
आपेगावला माऊलींचा जन्म झाला, नेवाशाला ज्ञानेश्वरीला जन्म दिला आणि आळंदीला आपण भक्तांना जन्म दिला असा जन्माचा इतिहास जीवनात आपल्याला पहायला मिळतो. जन्म हा विषय फार कमी जणांना माहित आहे. जन्माच्या कथा जन्म घेतल्यानेही कळत नाहीत.
विष्णू महाराज पारनेरकर
---------
ज्ञानेश्वरी: भावनेचा फुलोरा
-----
आपेगावला माऊलींचा जन्म झाला, नेवाशाला ज्ञानेश्वरीला जन्म दिला आणि आळंदीला आपण भक्तांना जन्म दिला असा जन्माचा इतिहास जीवनात आपल्याला पहायला मिळतो. जन्म हा विषय फार कमी जणांना माहित आहे. जन्माच्या कथा जन्म घेतल्यानेही कळत नाहीत. श्रीकृष्णाने अजुर्नाला एकच सांगितले की अजुर्ना तुझ्या माझ्यात एकच गोष्ट आहे ती म्हणजे तुही मनुष्य रूपात आणि मीही मानुष्य रूपात आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे कथा आहे. प्रत्येक प्रसंग आहे. विद्वानाच्या पद्धतीने आणि पुराणिकांच्या पद्धतीने. भावार्थ दीपिका.तत्वार्थ दीपिका नाही. भाव समजून घ्यायचा असतो. ज्ञानेश्वरीइतका ईश्वराचे दर्शन देणारा दुसरा ग्रंथ नाही. भाव सांगितला की गीता कळून जाईल. भाव हा विषय महत्त्वाचा. माणूस भावनिक असतो. भावनाप्रधान होऊ नये म्हणून ज्याची निर्मिती झाली त्याला विचार म्हणतात. भावना भरून आल्या तर विचारानी बांध घालायचा असतो. भावना नदीसारख्या असतात. भावनेचा फुलोरा मतीवरी... ज्ञानेश्वरी म्हणजे भावनेचा फुलोरा आहे. तुम्ही माज्या प्रत्येक विषयाला अभ्यास म्हणत आहात. अभ्यास हा माझा विषय नाही. तुम्ही अभ्यासाची धास्ती घेतली. पुष्कळ जण त्यामुळे येत नाही. ज्ञानेश्वरी भावनेचा विषय. माणूस ईश्वर संवाद आहे. गुरु शिष्य संवाद आहे.