व्हिडिओ काॅलवरून शेतकऱ्याच्या मदतीला ‘ज्ञानेश्वर’चे हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:21 AM2021-01-25T04:21:09+5:302021-01-25T04:21:09+5:30

बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील एका ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या एक एकर उसाला शुक्रवारी (दि.२२) दुपारी एकच्या सुमारास आग ...

Dnyaneshwar's hand in helping a farmer through a video call | व्हिडिओ काॅलवरून शेतकऱ्याच्या मदतीला ‘ज्ञानेश्वर’चे हात

व्हिडिओ काॅलवरून शेतकऱ्याच्या मदतीला ‘ज्ञानेश्वर’चे हात

बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील एका ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या एक एकर उसाला शुक्रवारी (दि.२२) दुपारी एकच्या सुमारास आग लागली. यात उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेची संत ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या तज्ज्ञ संचालकांना माहिती मिळताच त्यांनी व्हिडिओ काॅलद्वारे शेतकऱ्याशी संवाद साधत मदतीचा हात दिला आहे.

बोधेगावातील लाडजळगाव रस्त्यावरील कोकाटे वस्ती येथील बाबासाहेब कृष्णाजी कोकाटे (वय ५२) या शेतकऱ्याचा एक एकर ऊस शाॅर्टसर्किटमुळे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला. याबाबत शनिवारी (दि.२३) संत ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ज्ञ संचालक तथा शेवगाव पंचायत समितीचे सभापती डाॅ. क्षितिज घुले यांना सोशल मीडियातून माहिती मिळाली. यावेळी घुलेंनी कारखान्याचे कर्मचारी यांना तात्काळ संबंधित शेतकऱ्यांच्या शेतात जाण्याच्या सूचना दिल्या. तसेच कार्यक्षेत्रातील सहकारी संचालक शंकरराव लक्ष्मण पावसे यांचे पुत्र तथा खामपिंप्रीचे उपसरपंच संतोष पावसे, डाॅ. क्षितिज घुले युवा मंचचे पदाधिकारी सचिन घोरतळे यांना घटनास्थळी पाठवले. त्यानंतर संबंधित शेतकऱ्याशी घोरतळे यांच्या मोबाइलवर व्हिडिओ काॅल करून संवाद साधला. तसेच काळजी करू नका, कारखान्याकडून तातडीने उसाची तोड केली जाईल, असा शब्द देऊन डाॅ. क्षितिज घुले यांनी शेतकऱ्यास धीर दिला. दरम्यान, उपस्थित कारखान्याचे कर्मचारी विनायक जगताप, अशोक तहकीक, अशोक गलधर आदींना तात्काळ जळीत ऊस तोडण्याच्या सूचना केल्या.

याप्रसंगी मेजर पांडुरंग कोकाटे, शिवाजी कोकाटे, महादेव बनकर, राहुल पालवे, संदीप गोर्डे, विठ्ठल तहकीक, मधू बनकर आदींसह शेतकरी उपस्थित होते.

फोटो ओळी २४ बोधेगाव ॲग्री

बोधेगाव येथील बाबासाहेब कोकाटे यांच्या ऊस जळीतप्रसंगी ज्ञानेश्वर कारखान्याचे तज्ज्ञ संचालक डाॅ. क्षितिज घुले यांनी व्हिडिओ काॅलवरून शेतकऱ्याशी संवाद साधला. यावेळी खामपिंप्रीचे उपसरपंच संतोष पावसे, सचिन घोरतळे व इतर.

Web Title: Dnyaneshwar's hand in helping a farmer through a video call

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.