पदे मागू नका, संयम ठेवा - रावसाहेब दानवे
By Admin | Published: May 9, 2017 02:51 PM2017-05-09T14:51:06+5:302017-05-09T14:51:06+5:30
सद्यस्थितीत भाजपाची परिस्थिती उत्तम आहे. देशभरात भाजपामध्ये येणारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आज पक्षात येणारे दुसºयाच दिवशी पदे मागतात.
ल कमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : सद्यस्थितीत भाजपाची परिस्थिती उत्तम आहे. देशभरात भाजपामध्ये येणारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आज पक्षात येणारे दुसºयाच दिवशी पदे मागतात. मात्र प्रवेश करणारांनी लगेच पदे मागू नयेत. संयम ठेवल्यास न्याय मिळेल, असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले. पंडीत दिनदयाळ उपाध्य़ाय जन्मशताब्दी वर्र्षानिमित्त गांधी मैदान येथे झालेल्या कार्यकर्र्ता मार्गदर्शन मेळावा व पक्षप्रवेश कार्यक्रमानिमित्त आयोजित कार्यक्रमात दानवे बोलत होते. यावेळी भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू, खा. दिलीप गांधी, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, आ. भिमराव धोंडे, बबनराव पाचपुते, उपमहापौर श्रीपाद छिंदम यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी नगरसेवक किशोर डागवाले, नरेंद्र कुलकर्र्णी, नंदा कुलकर्र्णी,विठ्ठल सप्रे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपामध्ये प्रवेश करणारांनी मनामधील असुरक्षिततेची भावना काढून टाकावी, असे सांगत दानवे यांनी भाजप महासमुद्र असल्याचे सांगितले. ते म्हणाले, सद्यस्थितीत भाजप जगात व देशात एक नंबरचा पक्ष झालाय. त्यामुळे पदांची संख्या वाढली आहे. अनेकांना पक्षामध्ये काम करण्याची संधी दिसत आहे. पक्षामध्ये प्रवेश करणाराचंी संख्या वाढत चाललीय. सर्व निवडणुकांमध्ये भाजपाला विजय मिळत आहे. अहमदनगरच्या येणाºया महापालिकेच्या निवडणुकीतून भाजपाची सत्ता येणार आहे. त्यामुळे शहरातील कोपकोपºयातील नेते प्रवेश करत आहे. हा फक्त पहिला टप्पा आहे. निवडणुक लागेपर्यत मोठ्या संख्येने भाजपमध्ये प्रवेश झालेला दिसून येईल. जिल्ह्यातील विधानसभेच्या तेराही जागा भाजपाला जिंकायच्या आहेत. त्यासाठीची ही तयारी आहे. मात्र नव्याने पक्षात येणारांनी ताठर भुमिका ठेवू नये. काम करण्याची सवय ठेवावी. दुस-याच दिवशी पदे मागू नयेत. भाजपामध्ये चांगले काम केल्यास व संयम ठेवल्यास सर्र्वांना योग्य वेळेस संधी मिळते, असेही ते म्हणाले.