विरोधकांच्या अफवांवर विश्वास ठेऊ नका-मोनिका राजळे; कासारपिंपळगाव येथे साधला कार्यकर्त्यांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 02:08 PM2019-10-14T14:08:35+5:302019-10-14T14:09:42+5:30

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या विषयी असलेला मतदारांच्या मनातील आदर मतपेटीतून व्यक्त होणार आहे. गेल्या पाच वर्षात शेवगाव, पाथर्डी मतदारसंघामध्ये मिळालेल्या अकराशे कोटी रूपये निधीतून काही विकास कामे पूर्ण झाली आहेत. त्यातील काही कामे सुरू आहेत. विरोधकांना विकासावर बोलायला जागा नसल्याने अफवा पसरविल्या जात आहेत. या अफवांवर लक्ष न देता आपापल्या बूथवर लक्ष देऊन मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी लक्ष द्यावे, असे आवाहन आमदार मोनिका राजळे यांनी केले.

Do not believe the rumors of opposition - Monica Rajale; Interaction with activists at Kasaripimpalgaon | विरोधकांच्या अफवांवर विश्वास ठेऊ नका-मोनिका राजळे; कासारपिंपळगाव येथे साधला कार्यकर्त्यांशी संवाद

विरोधकांच्या अफवांवर विश्वास ठेऊ नका-मोनिका राजळे; कासारपिंपळगाव येथे साधला कार्यकर्त्यांशी संवाद

शेवगाव : ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या विषयी असलेला मतदारांच्या मनातील आदर मतपेटीतून व्यक्त होणार आहे. गेल्या पाच वर्षात शेवगाव, पाथर्डी मतदारसंघामध्ये मिळालेल्या अकराशे कोटी रूपये निधीतून काही विकास कामे पूर्ण झाली आहेत. त्यातील काही कामे सुरू आहेत. विरोधकांना विकासावर बोलायला जागा नसल्याने अफवा पसरविल्या जात आहेत. या अफवांवर लक्ष न देता आपापल्या बूथवर लक्ष देऊन मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी लक्ष द्यावे, असे आवाहन आमदार मोनिका राजळे यांनी केले.
राजळे यांनी रविवारी कासारपिंपळगाव (ता. पाथर्डी) येथील त्यांच्या निवासस्थानी शेवगाव, पाथर्डी भागातून आलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आलेल्या प्रत्येकाचे म्हणणे, गा-हाणे समजून घेत राजळे यांनी सद्य परिस्थितीचा आढावा घेतला.
राजळे म्हणाल्या,  मतदारांशी दैनंदिन संपर्क ठेवावा. संपर्काच्या माध्यमातून मतदानाची टक्केवारी कशी वाढेल याकडे लक्ष द्यावे. ८० टक्क्याहून अधिक मतदान आपल्याला घडवून आणायचे आहे. नगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मतदानाचा इतिहास घडवायचा आहे. त्यांनी सर्व कार्यकर्त्यांकडून कामाचा आढावा अडीअडचणी जाणून घेत, आगामी काळामध्ये करावयाच्या कामासाठी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या. 

Web Title: Do not believe the rumors of opposition - Monica Rajale; Interaction with activists at Kasaripimpalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.