कोपर्डी हत्याकांडातील आरोपींना फाशी नको, जन्मठेप द्या, दोषींच्या वकिलांची विनंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 06:38 AM2017-11-22T06:38:45+5:302017-11-22T06:39:05+5:30

अहमदनगर : कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा निर्घृण खून केल्याच्या खटल्यात मंगळवारी दोन दोषींच्या वकिलांनी शिक्षेवर युक्तिवाद केला.

Do not hang the murderers of the Coppardii, give birth to life imprisonment, plead guilty advocates | कोपर्डी हत्याकांडातील आरोपींना फाशी नको, जन्मठेप द्या, दोषींच्या वकिलांची विनंती

कोपर्डी हत्याकांडातील आरोपींना फाशी नको, जन्मठेप द्या, दोषींच्या वकिलांची विनंती

अहमदनगर : कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा निर्घृण खून केल्याच्या खटल्यात मंगळवारी दोन दोषींच्या वकिलांनी शिक्षेवर युक्तिवाद केला. जितेंद्र शिंदेच्या वकिलाने फाशीऐवजी जन्मठेपेच्या शिक्षेची मागणी केली. तर नितीन भैलुमे याच्या वकिलाने कमीत कमी शिक्षा देण्याची मागणी केली. बुधवारी संतोष भवाळचे वकील व सरकारी पक्षाकडून अ‍ॅड. उज्ज्वल निकम शिक्षेबाबत युक्तिवाद करतील.
शिंदे याच्या वतीने योहान मकासरे, तर भैलुमे याच्या वतीने प्रकाश आहेर यांनी युक्तिवाद केला़ मकासरे म्हणाले, शिंदे याला पत्नी व आई-वडील आहेत.त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे़ ही बाब विचारात घेऊन त्याला जन्मठेपेची शिक्षा द्यावी़
न्यायालयाने जितेंद्र शिंदे यास शिक्षेबाबत काही बोलायचे आहे का, अशी विचारणा केली. त्यावर, आपण त्या मुलीला मारलेच नाही, दुसरेच कुणीतरी मारले आहे. शिक्षा एक दिवस काय आणि हजार दिवसांची काय, असे उत्तर त्याने दिले.
मी निर्दोष आहे - भैलुमे
नितीन भैलुमे याला समोर बोलावून शिक्षेबाबत न्यायालयाने विचारले, तेव्हा त्याने ‘मी निर्दोष आहे’ एवढेच सांगितले. त्याच्या डोळ्यात पाणी आले होते.

Web Title: Do not hang the murderers of the Coppardii, give birth to life imprisonment, plead guilty advocates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.