कुकडीवाले सवतीची लेकरं आहेत काय?

By Admin | Published: June 2, 2014 12:28 AM2014-06-02T00:28:51+5:302014-06-02T00:38:12+5:30

श्रीगोंदा : घोड धरणात पाणी नसताना शेतीसाठी आवर्तन सोडले आनंद वाटला. मात्र कुकडी प्रकल्पात पाणी असताना आवर्तन सोडले नाही.

Do you have a cottage cheese? | कुकडीवाले सवतीची लेकरं आहेत काय?

कुकडीवाले सवतीची लेकरं आहेत काय?

श्रीगोंदा : घोड धरणात पाणी नसताना शेतीसाठी आवर्तन सोडले आनंद वाटला. मात्र कुकडी प्रकल्पात पाणी असताना आवर्तन सोडले नाही. लोकप्रतिनिधी घोडच्या आतर्वनासाठी आटापिटा करतात मग कुकडीवाले सवतीची लेकरं आहेत काय? असा टोला कुकडी कारखान्याचे संस्थापक कुंडलिकराव जगताप यांनी मारला़ जगताप म्हणाले की, घोड धरणात पुरेसे पाणी नसताना पाणी सोडले? ज्यांच्या मनगटात जोर आहे, अशांना पाणी मिळेल़ घोड धरणावरील बंधार्‍याच्या फळ्या का काढल्या नाहीत, आवर्तन सोडण्याचे हे नाटक आहे. घोड व कुकडीला किमान प्रत्येकी ५ आवर्तने सोडता आली असती़ परंतु घोडला चार व कुकडीला तीन आवर्तने दिली. बाष्पीभवन आणि वाया पाणी १० टीएमसी दाखविले़ कुकडीचे आवर्तन उशिरा सोडावे अशी मागणी आम्ही केली़ परंतु लोकसभा निवडणुकीवर डोळा ठेवून त्यांनी आवर्तन सोडले. जून महिन्यात पाऊस लांबला तर पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा मधील ५० लाख मे. टन ऊस जळून जाईल याला जबाबदार कोण, सवाल जगताप यांनी केला़ यावेळी प्रा. तुकाराम दरेकर, डी. एम. भालेराव, आण्णासाहेब शेलार, अजित जामदार उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी) पाटपाण्यासाठी १०-१२ वर्षे आंदोलने आम्ही आंदोलने केली़ परंतु आता शरीर साथ देत नाही. काहींची सत्तेची मस्ती अन् सुस्ती उतरविण्यासाठी शेतकर्‍यांनी जन आंदोलन उभे करावे़ -कुंडलिकराव जगताप लोकसभा निवडणुकीत काष्टीत कमळ फुलले़ वीज रोहित्र जळाल्याच्या नावाखाली काष्टीकरांना धडा शिकविण्यासाठी पाच दिवस काष्टीची नळ पाणी पुरवठा योजना कोणी बंद ठेवली? -राहुल जगताप, अध्यक्ष, कुकडी साखर कारखाना अधिकार्‍यांना पैसे देवून काही नेते श्रीगोंदा शहरातील वीज पुरवठा खंडीत करतात, असा आरोप आ. पाचपुतेंनी केला़ आ. पाचपुतेंनी याची चौकशी करुन दोषी अधिकार्‍यास निलंबित करावे व पैसे देणार्‍या नेत्याचे नाव जाहीर करावे. -बाळासाहेब नाहाटा, सभापती, बाजार समिती, श्रीगोंदा घोड कुकडीच्या पाण्याचे चोख पद्धतीने नियोजन केले. यापुढेही नियोजन करणार आहे. दिशाभूल करणारे कोणी कितीही आरोप केले तरी हिंमत हारणार नाही. कुणामुळे तालुक्याची प्रगती झाली हे सर्वांना माहीत आहे. आम्ही उन्हाळ्यात घराच्या बाहेर पडत नाही़ नेहमी जनता आणि त्यांच्या प्रश्नांबरोबर असतो़ -बबनराव पाचपुते, आमदार.

Web Title: Do you have a cottage cheese?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.