कोपरगावातील डॉक्टर महिलेची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 04:12 PM2020-06-12T16:12:27+5:302020-06-12T16:13:03+5:30
कोपरगाव शहरातील एका महिला डॉक्टरला मागील आठवड्यात २ जूनला कोरोनाची लागण झाली होती. प्रशासनाने त्यांना कोपरगाव कोरोना केअर सेंटरमध्ये उपचारासाठी ठेवले होते. त्यांच्यावर आठ दिवस उपचार केल्यानंतर दहाव्या दिवशी बाधित महिलेचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे या डॉक्टर महिलेने कोरोनावर मात केली आहे.
कोपरगाव : शहरातील एका महिला डॉक्टरला मागील आठवड्यात २ जूनला कोरोनाची लागण झाली होती. प्रशासनाने त्यांना कोपरगाव कोरोना केअर सेंटरमध्ये उपचारासाठी ठेवले होते. त्यांच्यावर आठ दिवस उपचार केल्यानंतर दहाव्या दिवशी बाधित महिलेचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे या डॉक्टर महिलेने कोरोनावर मात केली आहे.
शुक्रवारी (दि.१२) प्रशासनाने त्यांना डिस्चार्ज देऊन घरी सोडले आहे. कोपरगाव केअर सेंटरमध्येच उपचार घेऊन बºया झालेल्या डॉक्टर महिला या पहिल्याच रुग्ण आहेत. या डॉक्टर महिलेला कोविड केअर सेंटरमध्ये वैद्यकीय अधीक्षक डॉ.कृष्णा फुलसौंदर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संतोष विधाते, डॉ वैशाली बडदे, यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू होते.
तहसीलदार योगेश चंद्रे, पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी कोरोनामुक्त झालेल्या महिला डॉक्टर भावूक झाल्या होत्या. याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक भारत नागरे, आपत्ती व्यवस्थापन समन्वयक सुशांत घोडके, नगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.