डॉक्टरांचा सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:28 AM2021-06-16T04:28:15+5:302021-06-16T04:28:15+5:30
------------- उपलब्ध असलेल्या सर्व लसी अतिशय गरजेच्या असून अत्यंत तीव्र व मध्यम आजारापासून संरक्षण करतात. डोस- कोविशिल्ड- दोन डोस ...
-------------
उपलब्ध असलेल्या सर्व लसी अतिशय गरजेच्या असून अत्यंत तीव्र व मध्यम आजारापासून संरक्षण करतात.
डोस- कोविशिल्ड- दोन डोस ( ८४ दिवसानंतर दुसरा डोस)
कोव्हॅक्सिन- दोन डोस (२८ दिवसानंतर दुसरा डोस)
स्पुतनिक- दोन डोस (२१ दिवसानंतर दुसरा डोस- लवकरच ही लस येईल.)
कोरोना होवून गेलेल्या रुग्णांचे बरे झाल्यानंतर तीन महिन्यांनी लसीकरण करावे
पहिल्या डोसनंतर कोरोना झाल्यास दुसरा डोस दोन महिन्यानंतर घेता येईल.
कोणत्याही आजारांसाठी दाखल करण्याची, ऑपरेशन करण्याची वेळ आल्यास लसीकरण एक-दोन महिन्यांनी करावे.
स्तनपान करणाऱ्या माता लसीकरण घेऊ शकतात.
गरोदर स्त्रियांना अजून लसीकरणाची परवानगी नाही
ताप अथवा इतर सौम्य आजार असल्यास बरे झाल्यानंतर १५ दिवसानंतर लस घ्यावी.
रक्तदान, लस घेतल्यानंतर अथवा आरटी-पीसीआर तपासणी निगेटिव्ह आल्यानंतर १५ दिवसांनी करता येईल.
दोन्ही डोस एकाच लसीचे घेणे गरजेचे आहे.
लसीकरण झाल्यानंतरसुद्धा मास्क वापरणे, सॉनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे आहे.
-डॉ. सचिन वहाडणे, डॉ. अनिल आठरे