डॉक्टरांचा सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:15 AM2021-06-17T04:15:45+5:302021-06-17T04:15:45+5:30
१. कोविडनंतर फुप्फुसात जे व्रण तयार होतात, ती फुप्फुसावरील नैसर्गिक खपली आहे. ती फायब्रोसिस सारखी असेल, पण नक्कीच ...
१. कोविडनंतर फुप्फुसात जे व्रण तयार होतात, ती फुप्फुसावरील नैसर्गिक खपली आहे. ती फायब्रोसिस सारखी असेल, पण नक्कीच गंभीर समस्या नाही.
२. केवळ ज्या रुग्णांमध्ये कोविडचा आजार अतिगंभीर होता, अशाच रुग्णांमध्ये दीर्घ काळ फुप्फुसात व्रण दिसून आले आहेत.
३. साधारण ८५ ते ९० टक्के रुग्णांमध्ये हे व्रण कालांतराने नाहीसे होण्याचे दिसून आले आहे.
४. ज्या रुग्णांना व्हेंटिलेटर बऱ्याच कालावधीसाठी लागला होता, ज्यांना आधीपासून फुप्फुसाचा आजार होता, अति धूम्रपान आणि जे दीर्घकालीन ऑक्सिजनवर अवलंबून होते, केवळ अशाच रुग्णांपैकी काहीच रुग्ण हे फायब्रोसिस प्रणालीमध्ये मोजता येतील.
५. या अशाच काही मोजक्या रुग्णांमध्ये कोविडनंतर फुफ्फुसांच्या आत अनेक सूक्ष्म गुठळ्या होऊ शकतात आणि फुप्फुसात जाळी निर्माण होऊ शकते.
६. फायब्रोसिस कमी करण्यासाठी रक्त पातळ होणाऱ्या व सूज कमी करणाऱ्या काही मोजक्याच प्रणाली उपयुक्त ठरू शकतात. केवळ तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार ही औषधे वापरावी.
७. वेळ आणि वेळ हेच खरे औषध आहे. फुफ्फुसाच्या फायब्रोसिसचे निराकरण करण्यासाठी वेळ द्या. वेळ सर्व काही बरे करते !!
८. फुफ्फुसाचे व्यायाम लक्षणे सोडविण्यात नक्कीच मदत करतात. फिजिओथेरपीची मदत आवश्यक आहे.
९. कोविडनंतर फुफ्फुसांना संसर्ग होऊ शकतो आणि जर रुग्णाला ताप, अति खोकला आणि खोकल्यांमध्ये रक्त येत असेल तर डॉक्टरांची ताबडतोब मदत घ्या.
१०. काही रुग्णांना घरीही २-३ महिन्यांपर्यंत ऑक्सिजनची गरज भासू शकते, परंतु ते कालांतराने सुधारतात.
११. भरपूर पाणी पिणे, संतुलित आहार आणि आवश्यक औषधे रुग्णांना लवकर बरे होण्यास मदत करतात.
१२. वारंवार छातीसाठी सिटीस्कॅन करण्याची गरज नाही आणि कोविडनंतरच्या टप्प्यात सिटीस्कॅनचे स्कोअर बघण्याची अजिबात आवश्यकता नाही.
१३. फुफ्फुस फायब्रोसिस इतर विविध कारणांमुळे होऊ शकतो आणि तो कोविडनंतरच्या या आजारापेक्षा खूप वेगळा आहे.
-डॉ. महावीर मोदी (चेस्ट स्पेशालिस्ट, रुबी हॉल क्लिनिक, पुणे)