डॉक्टरांचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:23 AM2021-05-25T04:23:53+5:302021-05-25T04:23:53+5:30

१) मधुमेह हा कोविड-१९ साठी अती जोखमीच्या आजारात समाविष्ट केलेला आहे. २) मधुमेहाच्या रुग्णांमध्ये कोविड-१९ हा आजार गंभीर स्वरुप ...

Doctor's advice | डॉक्टरांचा सल्ला

डॉक्टरांचा सल्ला

१) मधुमेह हा कोविड-१९ साठी अती जोखमीच्या आजारात समाविष्ट केलेला आहे.

२) मधुमेहाच्या रुग्णांमध्ये कोविड-१९ हा आजार गंभीर स्वरुप घेऊ शकतो

३)मधुमेहाच्या रुग्णांमध्ये उपाशी पोटची साखर (फास्टींग) १२० पेक्षा कमी तसेच जेवणानंतरची साखर ही १८० पेक्षा कमी हवी. तसेच तीन महिन्यांची सरासरी साखर (एचबीएआयसी) हे ७.०० पेक्षा कमी हवे.

४)कोविड-१९ ह्या आजारामध्ये मधुमेह नसलेल्या रुग्णांची साखर सुद्धा अनियंत्रित प्रमाणात वाढू शकते.

५)मधुमेही रुग्णांमध्ये स्टिरॉइड्सचा वापर शक्यतो टाळला जातो. जेव्हा ऑक्सिजनची पातळी खालावते तेव्हाच फक्त स्टिरॉइड्स वापरले जातात.

६)मधुमेहामुळे जर किडनी, हृदय, रक्त वाहिन्या यावर परिणाम झालेला असेल तर कोविड-१९ मुळे रक्त गोठण्याची प्रक्रिया जास्त असेल तर हृदयविकार, पॉरालिसिसचा धोका जास्त असतो.

७) अनियंत्रित साखरेमुळे बुरशीजन्य आजार, इतर जंतूंचा संसर्ग जास्त प्रमाणात होऊ शकतो.

८)कोविड-१९ मुळे काही रुग्णांमध्ये मधुमेहाची सुरुवात होऊ शकते.

९)मधुमेह नियंत्रणात असेल तर कोविड-१९ चा संसर्ग नियंत्रित राहू शकतो.

१०) कोविड-१९ च्या रुग्णांनी बरे झाल्यानंतर सुद्धा पुढील सहा महिन्यांपर्यंत रक्त शर्करा नियमित तपासावीत .

----

संकलन : डॉ. अक्षय झावरे (एम.डी. मेडिसीन)

Web Title: Doctor's advice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.