डॉक्टरांचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:18 AM2021-05-30T04:18:23+5:302021-05-30T04:18:23+5:30

१) अतिशय सौम्य आजार ज्या रुग्णांना अतिशय सौम्य आजारासाठी कोविड केअर सेंटरमध्ये भरती केले आहे, अशा रुग्णांना डिस्चार्ज ...

Doctor's advice | डॉक्टरांचा सल्ला

डॉक्टरांचा सल्ला

१) अतिशय सौम्य आजार

ज्या रुग्णांना अतिशय सौम्य आजारासाठी कोविड केअर सेंटरमध्ये भरती केले आहे, अशा रुग्णांना डिस्चार्ज सेंटरमध्ये भरती केले आहे. लक्षणे सुरू झाल्यानंतर १० दिवसानंतर करता येईल. त्यांना तीन दिवस ताप आलेला नव्हता व ऑक्सिजन ९५ टक्क्यांपेक्षा जास्त असावा.

डिस्चार्जनंतर अजून सात दिवस घरी विलगीकरण पाळणे गरजेचे आहे. स्वत:चा ताप, ऑक्सिजनचे प्रमाण यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

२) मध्यम तीव्रतेचा आजार (ऑक्सिजन बेडस्)

ज्या रुग्णांची लक्षणे तीन दिवसात बरे झाले व ऑक्सिजन सॉच्युरेशन ९५ टक्क्यांच्यापुढील चार दिवस राहत असल्यास- अशा रुग्णांना लक्षणे सुरू झाल्यानंतर १० दिवसांनंतर डिस्चार्ज करता येईल.

परंतु तीन दिवस ताप आलेला नसावा. दम नसावा. ऑक्सिजनची गरज नसावी.

डिस्चार्जनंतर अजून सात दिवस घरी विलगीकरण पाळावे.

ऑक्सिजनची गरज पडणाऱ्या ज्या रुग्णांची लक्षणे तीन दिवसांमध्ये बरी होत नाहीत. ऑक्सिजनची गरज पडते. अशा रुग्णांच्या डिस्चार्ज पूर्ण लक्षणे गेल्यानंतरच. ऑक्सिजनशिवाय तीन दिवस सॉच्युरेशन नॉर्मल राहात असल्यास होईल.

३) अतिशय सिरिअस रुग्ण (आयसीयू)तसेच प्रतिकारशक्ती कमी असलेले रुग्ण, जसे कॉन्सर असलेले, अवयव प्रतिरोपण, एचआयव्ही बाधित. अशा रुग्णांना डिस्र्चार्ज, पूर्ण लक्षणे गेल्यानंतरच.

डिस्चार्जनंतर सात दिवस घरी विलगीकरण पाळणे, प्रथिनयुक्त आहार घेणे,श्वासाचे व्यायाम करणे, मन प्रसन्न ठेवणे गरजेचे आहे.

(स्त्रोत : मिनिस्टरी ऑफ हेल्थ ॲण्ड फॅमिली वेल्फेअर)

Web Title: Doctor's advice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.