डॉक्टरांचा सल्ला....म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:19 AM2021-05-16T04:19:51+5:302021-05-16T04:19:51+5:30

म्युकरमायकोसिस या बुरशीचा संसर्ग कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांमध्ये वाढत्या प्रमाणात आढळून येत आहे. या बुरशीचा संसर्ग नाक, कान, घसा, ...

Doctor's advice .... m | डॉक्टरांचा सल्ला....म

डॉक्टरांचा सल्ला....म

म्युकरमायकोसिस या बुरशीचा संसर्ग कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांमध्ये वाढत्या प्रमाणात आढळून येत आहे. या बुरशीचा संसर्ग नाक, कान, घसा, जबडा आणि दात यापासून सुरू होऊन डोळे व मेंदूपर्यंत पोहोचून दृष्टीवर परिणम करू शकतो. प्रसंगी रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो.

कारणे : १) डायबेटिस- रक्तातील साखरेप्रमाणे नियंत्रणाबाहेर असल्यास

२) स्टेराॅॅईडस- जास्त दिवस स्टेराॅईडसची इंजेक्शन अथवा गोळ्या चालू असल्यास

३) रोगप्रतिकारशक्ती कमी करणारे आजार असल्यास उदा. एड्‌स, कॅन्सर, अवयव प्रत्यारोपण झाले असल्यास

४)वयस्कर व्यक्ती

५)जास्त दिवस ऑक्सिजनची गरज पडली असल्यास

लक्षणे : गालावर दुखणे, चेहऱ्यावर मुंग्या येणे, नाक कोरडे पडणे, नाकातून काळा स्राव येणे, दात दुखणे, दात हलायला लागणे, नाकावर व टाळूवर काळे डाग उमटणे, डोळा दुखणे, डोकेदुखी, दोन दोन प्रतिमा दिसणे, दृष्टी मंदावणे, आदी.

निदान : एन्डोस्कोपी, एमआरआई, बायओप्सी

म्युकरमायकोसिस या बुरशीचा संसर्ग फार वेगात पसरतो. म्हणून लवकर निदान व उपचारास सुरुवात केल्यास ऑपरेशनची गरज पडणार नाही.

लक्षणे दिसल्यास लगेच कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉक्टरांना दाखविणे, डोळे दुखत असल्यास, दृष्टी कमी होत असल्यास नेत्रतज्ज्ञ डॉक्टरांना दाखविणे आवश्यक आहे.

-----------

Web Title: Doctor's advice .... m

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.