आर्थिक कारणातून डॉक्टरची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 12:38 PM2018-06-05T12:38:03+5:302018-06-05T12:38:34+5:30
शहरातील प्रसिद्ध भूलतज्ज्ञ डॉ़ महेश राऊत (वय ४१) यांनी सोमवारी रात्री मार्केटयार्ड परिसरातील फाटके हॉस्पिटलमध्ये इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी ही घटना उघडकिस आली.
अहमदनगर: शहरातील प्रसिद्ध भूलतज्ज्ञ डॉ़ महेश राऊत (वय ४१) यांनी सोमवारी रात्री मार्केटयार्ड परिसरातील फाटके हॉस्पिटलमध्ये इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी ही घटना उघडकिस आली.
डॉ़ राऊत यांच्या मृतदेहाजवळ पोलीसांना एक चिठ्ठी आढळून आली आहे. यामध्ये घरगुती व आर्थिक कारणातून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख आहे. घटनेची माहिती समजातच जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा व कोतवाली पोलीस ठाण्याचे निरिक्षक रमेश रत्नपारखी यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. शर्मा यांनी हॉस्पिटलमधील सीसीटिव्ही फुटेज तपासण्याचे आदेश दिले आहेत.
डॉ. राऊत हे फाटके हॉस्पिटल व जिल्हा रूग्णालयात भूलतज्ज्ञ म्हणून कार्यरत होते. सोमवारी रात्री ते फाटके हॉस्पिटलच्या रेस्टरूममध्ये थांबले होते. रात्री त्यांनी मांडीच्यावरती इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी हॉस्पिटलमधील कर्मचारी साफसफाईसाठी आले तेव्हा त्यांना रेस्टरूमचा दरवाजा बंद दिसला. कर्मचाऱ्यांनी दरवाजात वाजविला आतून मात्र काहीच प्रतिसाद आला नाही. यावेळी दरवाजा तोडून कर्मचारी आत गेले तेव्हा त्यांना डॉ. राऊत यांचा मृतदेह आढळून आला. यावेळी कोतवाली पोलीसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलीसांनी या घटनेची नोंद केली आहे.